चिनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Pura X चीनमध्ये लाँच केला आहे. हा क्लॅमशेल स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन 6.3-इंचचा इनर डिस्प्ले आणि 3.5-इंचची एक्सटर्नल स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. यात 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट दिली आहे.
Pura X ची किंमत
Huawei Pura X च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 7,499 (सुमारे ₹89,300) आहे, तर 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 7,999 (सुमारे ₹95,600) ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे. White, Grey, Red आणि Black या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
Huawei ने याचा कलेक्टर्स एडिशन देखील लाँच केला आहे, ज्यामध्ये बॅक कवरवर तीन रंगांचा डिझाइन आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर दिले आहे. Pura X कलेक्टर्स एडिशन च्या 16GB + 512GB वेरिएंटची किंमत CNY 8,999 (सुमारे ₹1,07,400) आणि 16GB + 1TB वेरिएंटची किंमत CNY 9,999 (सुमारे ₹1,19,100) आहे.
Pura X चे स्पेसिफिकेशन्स
हा फोल्डेबल स्मार्टफोन HarmonyOS 5.0.1 वर चालतो. यात 6.3-इंचाची OLED LTPO 2.0 इंटरनल स्क्रीन (1,320 x 2,120 पिक्सल्स) असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. Huawei ने याच्या प्रोसेसरची (Processor) माहिती जाहीर केलेली नाही.
यामध्ये 3.5-इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले (980 × 980 पिक्सल्स) 120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट सह आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये 1,440Hz हाय-फ्रीक्वेन्सी PWM डिमिंग आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट दिला आहे.
याच्या ट्रिपल कॅमेरा युनिटमध्ये (Triple Camera Unit)
- 50MP चा प्रायमरी कॅमेरा
- 40MP चा अल्ट्रा-वाइड अँगल मॅक्रो कॅमेरा
- 8MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे.
याच्या इनर डिस्प्लेमध्ये 10.7MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी
यामध्ये Wi-Fi, Bluetooth, NFC, NavIC, GPS आणि USB Type-C पोर्ट सपोर्ट आहे. सेन्सर्सच्या बाबतीत अॅम्बियंट लाइट सेन्सर, कलर टेम्परेचर सेन्सर, जेश्चर सेन्सर, ग्रॅव्हिटी सेन्सर, हॉल सेन्सर, गायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर दिले आहेत.
हा स्मार्टफोन 4,720mAh बॅटरीसह येतो, जो 66W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो.