तैवानची टेक कंपनी HTC ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनचे नाव HTC Wildfire E5 Plus आहे. सध्या हा फोन वियतनाम मध्ये लॉन्च करण्यात आला असून, ग्रे आणि ब्लू या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
या फोनची किंमत 2,379,000 VND (सुमारे ₹6,800) आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च केला जाईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. HTC Wildfire E5 Plus मध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरा यांसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
चला, या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
HTC Wildfire E5 Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.745-इंच HD+ डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो आणि microSD कार्ड सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी HTC Wildfire E5 Plus मध्ये LED फ्लॅश असलेल्या ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
फोनला 5000mAh बॅटरी दिली असून, हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी यात फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेसियल रेकग्निशन देण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स दिले आहेत. HTC Wildfire E5 Plus ग्रे आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला असून, हा फोन या महिन्याच्या अखेरीस थायलंड मध्येही विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.