Honor Pad GT launched: Honor ने आपला नवीन स्मार्टफोन Honor GT Pro चीनमध्ये अधिकृतपणे सादर करताच, कंपनीने त्याचवेळी एक दमदार टॅबलेटही बाजारात आणले आहे. हा नवा टॅब म्हणजे Honor Pad GT असून, तो खूपच स्लिम आणि हलक्या वजनाचा आहे.
विशेष म्हणजे, अशा स्लीम डिझाइन असूनही या टॅबमध्ये 10,100mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या टॅबमध्ये शानदार डिस्प्ले, दमदार RAM आणि वेगवान प्रोसेसर मिळतो. चला पाहूया या नव्या टॅबची खास वैशिष्ट्ये आणि किंमत…
Honor Pad GT टॅबलेटची खास वैशिष्ट्ये
GizmoChina च्या रिपोर्टनुसार Honor Pad GT ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामधील मोठा डिस्प्ले. या टॅबमध्ये 11.5-इंच LCD पॅनेल देण्यात आले असून, ते 2.8K रिझोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, Oasis Eye Protection, DC Dimming आणि 500 निट्स पीक ब्राइटनेससह येते.
याला IMAX Enhanced सर्टिफिकेशन मिळाले आहे, ज्यामुळे अधिक immersive viewing experience मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. या टॅबमध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेटचा समावेश आहे.
10,100mAh बॅटरीसह दमदार परफॉर्मन्स
या टॅबमध्ये 10,100mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली असून, ती 66W वायर्ड फास्ट चार्जिंग (fast charging) ला सपोर्ट करते. इतक्या भारी स्पेसिफिकेशन्स आणि मोठ्या बॅटरी असूनही, या टॅबची जाडी केवळ 6.12mm आहे आणि वजन सुमारे 480g आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत पाहिले तर याच्या रिअरला 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे, तर selfie आणि video calling साठी फ्रंटला 8MP कॅमेरा आहे. ऑडिओसाठी, Honor Pad GT मध्ये 8 स्पीकर्ससह स्टीरिओ स्पीकर सेटअप आहे. या टॅबमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3 आणि Android 15 आधारित MagicOS 9.0 कस्टम स्किन दिले आहे.
किंमती आणि वेरिएंट्स
Honor Pad GT टॅबलेट Ice Crystal White, Phantom Grey आणि Ice Crystal Blue या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे. RAM आणि स्टोरेजनुसार हा टॅब चार वेरिएंट्समध्ये येतो.
8GB+128GB वेरिएंटची किंमत 1,899 युआन (अंदाजे ₹22,200), 8GB+256GB वेरिएंट 2,199 युआन (अंदाजे ₹25,600), 12GB+256GB वेरिएंट 2,499 युआन (अंदाजे ₹30,000) आणि 12GB+512GB वेरिएंटची किंमत 2,799 युआन (अंदाजे ₹32,600) इतकी आहे. कंपनी लाँच ऑफर अंतर्गत सर्व वेरिएंट्सवर 200 युआन (अंदाजे ₹2,300) ची सवलत देत आहे.