टेक ब्रँड Honor ने मिड-रेंजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Honor 400 Lite दमदार फीचर्ससह सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्लॅट फ्रेम, पिल-शेप्ड पंच होल आणि iPhone 15 Pro प्रमाणे दिसणारे कॅमेरा मॉड्यूल आहे. Honor 400 Lite हा फारच हलका आणि पातळ असून वापरण्यास अतिशय सोयीचा आहे. फोन फक्त 0.29 इंच पातळ असून त्याचे वजन 170 ग्रॅम आहे.
हा डिव्हाइस पाण्याच्या थेंबांपासून काही प्रमाणात सुरक्षित आहे, मात्र तो पूर्णपणे वॉटरप्रूफ नाही. तरीही, कंपनीचा दावा आहे की या फोनचा वापर underwater photography साठी देखील करता येऊ शकतो. चला तर मग पाहूया या स्मार्टफोनची संपूर्ण माहिती, डिझाइन आणि फिचर्स:
Honor 400 Lite चे फीचर्स
Honor 400 Lite मध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1.5K रिझोल्यूशन आणि 3,500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हा फोन MediaTek Dimensity 7025 Ultra SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज यासह येतो. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी यात 5,230mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 35W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा नवीन स्मार्टफोन Android 15 OS वर आधारित MagicOS 9.0 कस्टम स्किनवर काम करतो. फोटोग्राफीसाठी, यात 108MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, आणि एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. Honor ने या स्मार्टफोनमध्ये AI Eraser, AI Camera बटण, AI Translate आणि इतर अनेक AI फिचर्स (AI Features) दिले आहेत. सुरक्षा सुविधेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
Honor 400 Lite ची किंमत
Honor 400 Lite हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, फोनच्या किमती आणि उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, आधीच्या अफवांनुसार या फोनची किंमत सुमारे 350 युरो (₹30,000 च्या आसपास) असू शकते.