जर तुम्ही Google Pixel 9a खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. गूगलने 19 मार्च रोजी Pixel 9a भारतात लाँच केला होता, मात्र त्यावेळी सेलची तारीख जाहीर केली नव्हती.
TOIच्या रिपोर्टनुसार, गूगलने अधिकृत घोषणा केली आहे की हा फोन 16 एप्रिलपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. Pixel 9a मध्ये Tensor G4 चिप आहे, जी मागील वर्षी आलेल्या Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold मध्ये देखील होती. यामध्ये 48MP चा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये Pixel 9a चार रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे, मात्र भारतात हा स्मार्टफोन फक्त तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यात 5100mAh ची बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 30 तासांपेक्षा जास्त टिकते आणि Extreme Battery Saver Mode ऑन केल्यास 100 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. Pixel 9a Android 15 वर चालतो आणि याला 7 वर्षांसाठी OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. आता पाहूया या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
Google Pixel 9a ची भारतातील किंमत
भारतामध्ये Google Pixel 9a ची किंमत ₹49,999 आहे. हा स्मार्टफोन फक्त 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. भारतात हा फोन Iris (Blue), Obsidian (Black) आणि Porcelain (White) या तीन कलर ऑप्शनमध्ये मिळेल. Flipkart वर ऑनलाइन आणि Reliance Digital आणि Tata Croma सारख्या निवडक रिटेल स्टोअर्सवर ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
लॉन्च ऑफर अंतर्गत निवडक बँक कार्डांवर ₹3,000 चा इंस्टंट डिस्काउंट आणि 24 महिन्यांपर्यंत No-Interest EMI ऑप्शन देण्यात आला आहे. भारतात याची स्पर्धा iPhone 16e सोबत आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ₹59,900 आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये Pixel 9a च्या 128GB वेरिएंटची किंमत USD 499 (सुमारे ₹43,080) आणि 256GB वेरिएंटची किंमत USD 599 (सुमारे ₹51,715) ठेवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन Iris, Obsidian, Peony आणि Porcelain या चार रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Google Pixel 9a चे खास फीचर्स
प्रभावी डिस्प्ले आणि रॅम
Pixel 9a हा Dual SIM (Nano + eSIM) सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. यात 6.3-इंच (1080×2424 pixels) Actua (pOLED) डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz ते 120Hz च्या दरम्यान आहे. 2700 nits पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे.
हा फोन Tensor G4 प्रोसेसरसह Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसर वापरतो. यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे, मात्र स्टोरेज एक्स्पान्शनसाठी कोणताही स्लॉट देण्यात आलेला नाही. IP68 रेटिंग असल्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे.
तगडा कॅमेरा
Pixel 9a मध्ये 48MP चा मुख्य रियर कॅमेरा आहे, जो 1/2-इंच सेंसर, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), क्लोज्ड-लूप ऑटोफोकस आणि f/1.7 अपर्चर सोबत येतो. हा कॅमेरा 8x Super Res Zoom ला सपोर्ट करतो. याशिवाय 120-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा (f/2.2 अपर्चर) देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा (f/2.2 अपर्चर) देण्यात आला आहे.
गूगलने या स्मार्टफोनमध्ये Macro Focus, Add Me, Night Sight, Reimagine, Magic Eraser, Best Take, Photo Unblur आणि Portrait Light यांसारखे AI बेस्ड कॅमेरा फीचर्स समाविष्ट केले आहेत. फोनच्या रियर कॅमेराद्वारे 4K/60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते, तर 5x डिजिटल झूम चा सपोर्ट आहे. फ्रंट कॅमेरा 4K/30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो.
AI सपोर्ट आणि सिक्युरिटी फीचर्स
हा फोन Google Gemini AI सोबत येतो, जो Maps, Calendar आणि YouTube यांसारख्या अॅप्समध्ये AI असिस्टंट प्रदान करतो. Gemini Live च्या मदतीने युजर्स व्हॉइस-आधारित संवाद करू शकतात. Circle to Search, Pixel Studio, Car Crash Detection, Theft Detection आणि Find My Device यांसारखे सिक्युरिटी फीचर्सही यात आहेत.
कनेक्टिव्हिटी आणि ऑडिओ
फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, NFC, GPS, NavIC आणि USB 3.2 Type-C पोर्ट आहे. यात स्टिरिओ स्पीकर्स आणि ड्युअल मायक्रोफोन देखील देण्यात आले आहेत. याशिवाय Accelerometer, Gyroscope, Magnetometer, Barometer, Ambient Light Sensor आणि Proximity Sensor यांसारखे सेन्सर्स देखील आहेत.
बॅटरी आणि चार्जिंग
Pixel 9a मध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे, जी Google 45W Power Adapter आणि 7.5W Wireless (Qi) चार्जिंग ला सपोर्ट करते. हा फोन 23W Fast Charging ला सपोर्ट करतो. Extreme Battery Saver Mode ऑन केल्यावर हा फोन 100 तासांपर्यंत बॅकअप देतो. In-Display Fingerprint Scanner आणि Face Unlock चा सपोर्ट देखील आहे.
फोनचे वजन आणि माप
हा स्मार्टफोन 185.9 ग्रॅम वजनाचा आहे आणि याचे Dimensions 154.7 x 73.3 x 8.9 mm आहेत.