भारतात Garmin Instinct 3 सीरीजमधील मजबूत (rugged) स्मार्टवॉच अधिकृतरीत्या सादर करण्यात आले आहेत. या लाइनअपमध्ये Instinct 3 मॉडेल तसेच Instinct E व्हेरिएंटचा समावेश आहे. स्टँडर्ड Instinct 3 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे — यापैकी एका व्हेरिएंटमध्ये AMOLED डिस्प्ले असून दुसऱ्यामध्ये MIP पॅनल दिले गेले आहे, जो सोलर चार्जिंग (Solar Charging) सपोर्ट करतो.
Instinct E व्हेरिएंटमध्ये सुद्धा MIP डिस्प्ले देण्यात आले आहे. या वॉचेसना MIL-STD-810 ड्युराबिलिटी सर्टिफिकेशन आणि 10ATM वॉटर-रेसिस्टंट (Water Resistant) रेटिंग मिळाली आहे. यामध्ये कंपनीची SatIQ GPS तंत्रज्ञान देण्यात आली आहे. Garmin Instinct 3 सीरीजचे स्मार्टवॉच जानेवारी महिन्यात काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आले होते.
Garmin Instinct 3 सीरीजची भारतातील किंमत
Garmin Instinct E ची भारतातील किंमत ₹35,990 पासून सुरू होते, अशी माहिती कंपनीने दिली आहे. दुसरीकडे, Garmin Instinct 3 च्या 45mm सोलर मॉडेलसाठी किंमत ₹46,990 निश्चित करण्यात आली आहे.
तसेच, Garmin Instinct 3 चे 45mm आणि 55mm AMOLED व्हेरिएंट्स अनुक्रमे ₹52,999 आणि ₹58,999 मध्ये उपलब्ध आहेत. Instinct 3 सीरीजचे सर्व व्हेरिएंट्स सध्या Garmin India च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच देशभरातील निवडक प्रीमियम रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Garmin Instinct 3 सीरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
बिल्ड क्वालिटी आणि डिझाईन: Garmin Instinct 3 सीरीजचे स्मार्टवॉच मेटल-रीइन्फोर्स्ड बेज़ल्स आणि फायबर-रीइन्फोर्स्ड पॉलिमर केससह येतात, जे त्यांना अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवतात. तसेच स्क्रॅच-रेसिस्टंट डिस्प्लेमुळे हे वॉचेस रफ आणि टफ वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
ड्युराबिलिटी आणि वॉटर-रेसिस्टन्स: या वॉचेसना MIL-STD-810 मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन आणि 10ATM (100 मीटर) वॉटर-रेसिस्टंट रेटिंग प्राप्त झाली आहे, ज्यामुळे या वॉचेस कठीण हवामानात आणि पाण्यात देखील कार्यक्षम राहतात.
डिस्प्ले पर्याय: Instinct E आणि Instinct 3 Solar व्हेरिएंट्समध्ये MIP डिस्प्ले आहे जो सूर्यप्रकाशात सुद्धा स्पष्ट दिसतो. तर स्टँडर्ड Instinct 3 मध्ये 1.2 इंच AMOLED डिस्प्ले असून त्याचे 390×390 पिक्सेल रिझोल्यूशन आहे आणि हे Always-on फीचरला सपोर्ट करते.
इनबिल्ट फ्लॅशलाइट: Instinct 3 मध्ये इनबिल्ट LED फ्लॅशलाइट दिली आहे, ज्यामध्ये Red Light आणि Strobe Modes सुद्धा आहेत. हे फिचर विशेषतः रात्री ट्रेकिंग करताना किंवा इमरजन्सी प्रसंगी खूप उपयोगी पडते.
GPS आणि SatIQ तंत्रज्ञान: सर्व मॉडेल्स मल्टी-बँड GPS ला सपोर्ट करतात आणि Garmin ची SatIQ टेक्नोलॉजी सोबत येतात, जी पोजिशनिंग अचूक ठेवते आणि बॅटरीचा वापर कमी करते.
ABC सेन्सर्स आणि TracBack: या वॉचमध्ये Altimeter, Barometer आणि Compass यांसारखे ABC सेन्सर्स दिले आहेत. यासोबतचा TracBack फीचर युजरला त्यांनी आधी चाललेल्या मार्गावर पुन्हा नेण्यासाठी मदत करतो, जे विशेषतः ट्रेकिंग किंवा साहसी परिस्थितीत उपयोगी ठरते.
Garmin Messenger आणि सेफ्टी फिचर्स: Garmin Messenger च्या माध्यमातून टू-वे मेसेजिंग शक्य होते. तसेच LiveTrack, Incident Detection आणि Assistance Alerts यांसारखे सेफ्टी फिचर्स देखील देण्यात आले आहेत, जे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरू शकतात.
हेल्थ आणि वेलनेस ट्रॅकिंग: या सीरीजमध्ये Heart Rate Monitoring, Pulse Ox Sensor, Sleep Insights, HRV (Heart Rate Variability), Stress Tracking, मासिक पाळी आणि प्रेग्नन्सी इनसाइट्स यांसारखे अॅडव्हान्स हेल्थ फिचर्स दिले गेले आहेत.
स्पोर्ट्स आणि वर्कआउट मोड्स: Garmin Coach Support सोबत या वॉचमध्ये अनेक Preloaded Sports Modes उपलब्ध आहेत — जसे की Hiking, Running, Cycling, Swimming, Golf, HIIT, Strength Training, Pilates वगैरे.