मोठ्या स्क्रीनवर OTT कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि बजेटमुळे मोठा TV खरेदी करता येत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर्स घेऊन आलो आहोत. तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 43-इंच स्क्रीन साइज असलेले स्मार्ट टीव्ही (Smart TV) खरेदी करू शकता. Amazon वर काही निवडक मॉडेल्सवर आकर्षक सूट मिळत आहे.
SKYWALL 43 inches Full HD LED Smart TV
बिल्ट-इन WiFi सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये Android 9 आधारित सॉफ्टवेअर स्किन मिळते. यात Google Voice Assistant सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे तुम्ही केवळ आवाजाद्वारे टीव्ही कंट्रोल करू शकता. हा टीव्ही Netflix, YouTube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5 आणि Eros Now यांसारख्या अनेक OTT Platforms सपोर्ट करतो. या टीव्हीची किंमत ₹12,999 आहे.
VW 43 inches Linux Series
Linux सॉफ्टवेअरवर आधारित हा टीव्ही 60Hz रिफ्रेश रेटसह 43-इंचाचा डिस्प्ले ऑफर करतो. यामध्ये Stereo Speakers, दोन HDMI Ports, आणि दोन USB Ports देण्यात आले आहेत. हा टीव्ही Prime Video, YouTube, Zee5 आणि SonyLiv यांसारख्या OTT अॅप्ससाठी सपोर्ट करतो. या टीव्हीची किंमत ₹13,999 आहे. उत्तम साउंड अनुभवासाठी यामध्ये Down Firing Speakers देण्यात आले आहेत.
Kodak 43 inches 9XPRO Series
Kodak Smart TV मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले असून, तो 1920×1080 Pixels Resolution ऑफर करतो. यामध्ये Dual-Band WiFi, दोन USB Ports, आणि तीन HDMI Ports उपलब्ध आहेत. हा टीव्ही विशेष बँक ऑफर्ससह फक्त ₹16,999 मध्ये खरेदी करता येईल. HDFC Bank Credit Card वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सूट उपलब्ध आहे. तसेच, इतर बँक कार्ड्सवरही सवलत मिळू शकते.














