कमी दरात 8GB RAM असलेला itel स्मार्टफोन! Amazon च्या सेलमध्ये जबरदस्त संधी

Amazon सेलमध्ये itel Zeno 10 हा 8GB RAM सह स्मार्टफोन फक्त ₹5500 च्या आत मिळत आहे. मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी, आणि उत्कृष्ट फीचर्ससह एक उत्तम डील.

On:
Follow Us

Amazon च्या Great Summer Sale मध्ये कमी किमतीत दमदार परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही भन्नाट संधी आहे. itel Zeno 10 या जबरदस्त फोनवर सध्या शानदार डील देण्यात आली आहे.

हा फोन 8GB पर्यंत रॅम (3GB रिअल + 5GB Memory Fusion) सह येतो. फोनची मूळ किंमत ₹5799 असून, सध्या Amazon च्या सेलमध्ये ₹500 चा coupon discount दिला जात आहे. यामुळे हा फोन ₹5500 पेक्षा कमी दरात मिळू शकतो.

बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला हा फोन ₹579.90 पर्यंत स्वस्तात मिळू शकतो. तसेच तुम्ही हा फोन exchange bonus सह खरेदी करू शकता. मात्र लक्षात ठेवा, एक्सचेंज ऑफरमधील अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनची अवस्था, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज धोरणावर अवलंबून असेल.

itel Zeno 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

itel Zeno 10 मध्ये 1612 x 720 पिक्सल रिझोल्यूशन असलेली 6.56 इंच HD+ Display देण्यात आली आहे, जी 60Hz refresh rate ला सपोर्ट करते. या फोनमध्ये 8GB पर्यंत RAM (3GB रिअल + 5GB मेमरी फ्युजन) आणि 64GB स्टोरेज दिलं आहे. युजर्स MicroSD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफीसाठी यामध्ये 8MP रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5000mAh Battery देण्यात आली असून ती 10W Charging सपोर्ट करते.

ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बोलायचं झालं, तर हा फोन Android 14 Go Edition वर आधारित HiOS 14 वर चालतो. सिक्युरिटीसाठी कंपनीने यामध्ये Side-mounted Fingerprint Sensor दिला आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Dual 4G VoLTE, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C आणि 3.5mm Headphone Jack यांसारखे पर्याय दिले आहेत. itel Zeno 10 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – Open Purple आणि Phantom Crystal.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel