स्वस्तात नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Laptop Days Sale हि उत्तम संधी ठरू शकतो

Amazon Laptop Days सेलमध्ये HP, ASUS, Lenovo, Dell यासह अनेक ब्रँडच्या लॅपटॉपवर मोठ्या सवलती मिळत आहेत. काही लॅपटॉप ₹12,790 पासून सुरू होत असून, बँक ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

On:
Follow Us

Amazon ने भारतात Laptop Days Sale सुरू केली आहे. जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा उत्तम संधी ठरू शकतो. या सेलमध्ये HP, ASUS, Lenovo, Dell, Acer यासारख्या टॉप ब्रँडच्या लॅपटॉपवर मोठ्या सवलती मिळत आहेत.

Amazon वर ही सेल 5 मार्चपासून सुरू झाली असून 8 मार्चपर्यंत चालेल. या दरम्यान लॅपटॉपची किंमत ₹12,790 पासून सुरू होईल. चला तर मग, Amazon Laptop Days Sale मधील सर्वोत्तम ऑफर्स जाणून घेऊया.

Amazon Laptop Days Sale: बँक ऑफर

Amazon Laptop Days Sale मध्ये IDFC First Bank, Federal Bank आणि BOB क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ₹1,500 पर्यंत सवलत मिळत आहे. HDFC Bank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ₹1,000 पर्यंत इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच UCO Bank डेबिट कार्ड व्यवहारांवर ₹150 ची सवलत मिळत आहे.

बेस्ट लॅपटॉप डील्स:

AXL VayuBook Laptop

AXL VayuBook Laptop हा Amazon वर ₹12,890 मध्ये सूचीबद्ध आहे. कूपन ऑफर अंतर्गत 1% सवलत मिळते. HDFC Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ₹1,000 पर्यंत 10% इंस्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे, त्यामुळे प्रभावी किंमत ₹11,890 होईल.

ASUS Vivobook 15

ASUS Vivobook 15 हा Amazon वर ₹32,990 मध्ये उपलब्ध आहे. SBI Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ₹1,500 पर्यंत 10% इंस्टंट डिस्काउंट मिळतो, ज्यामुळे प्रभावी किंमत ₹31,490 होईल. या लॅपटॉपमध्ये Intel Core i3-1215U प्रोसेसर, 15.6-इंच FHD डिस्प्ले (60Hz रिफ्रेश रेट), 8GB RAM, 512GB स्टोरेज आणि 42WHr बॅटरी आहे.

Acer Aspire Lite

Acer Aspire Lite हा ₹32,990 मध्ये सूचीबद्ध आहे. HDFC Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ₹2,000 इंस्टंट डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे प्रभावी किंमत ₹30,990 होईल. यामध्ये 13th Gen Intel Core i3-1305U प्रोसेसर, 15.6-इंच फुल HD डिस्प्ले आणि Windows 11 Home ऑपरेटिंग सिस्टम मिळते.

MSI Modern 15 H

MSI Modern 15 H हा Amazon वर ₹52,090 मध्ये सूचीबद्ध आहे. IDFC First Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 7.5% (₹1,500 पर्यंत) सवलत मिळू शकते, त्यामुळे प्रभावी किंमत ₹50,590 होईल. Windows 11, Intel 13th Gen i5-13420H प्रोसेसर, 16GB RAM, 512GB NVMe SSD स्टोरेज यासह हा लॅपटॉप उत्तम परफॉर्मन्स देतो.

Microsoft New Surface Pro (11th Edition)

Microsoft New Surface Pro (11th Edition) हा ₹1,31,990 मध्ये उपलब्ध आहे. IDFC First Bank क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ₹1,500 पर्यंत 7.5% इंस्टंट डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे प्रभावी किंमत ₹1,30,490 होईल. हा लॅपटॉप Windows 11 Home Copilot + PC वर चालतो आणि यामध्ये 13-इंच LCD PixelSense टचस्क्रीन डिस्प्ले, Qualcomm Snapdragon X Plus (10 Core) प्रोसेसर, 16GB RAM, 512GB SSD स्टोरेज आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel