जर तुम्ही लांब टिकणारी बॅटरी आणि स्टायलिश डिझाइन असलेली स्मार्टवॉच (Smartwatch) शोधत असाल, तर अजून थोडे दिवस वाट बघा. कारण, प्रसिद्ध ब्रँड Amazfit २२ एप्रिल रोजी भारतात आपली नवी Amazfit Active 2 Smartwatch लॉन्च करणार आहे.
या वॉचचं सर्वप्रथम यावर्षीच्या सुरूवातीस CES इव्हेंटमध्ये प्रदर्शन करण्यात आलं होतं. त्यानंतर ती अमेरिका आणि युरोपमध्ये लॉन्च झाली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात येणाऱ्या या वॉचचा स्पेसिफिकेशन (Specifications) जागतिक मॉडेलसारखाच असण्याची शक्यता आहे. पाहूया या नव्या वॉचमध्ये नेमकं काय खास मिळणार आहे…
हलकी वजनात आणि AMOLED डिस्प्लेसह
नवीन Amazfit Active 2 वॉचमध्ये ४४mm स्टेनलेस स्टील केस, १.३२ इंच AMOLED डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन (Resolution) 466×466 पिक्सेल इतके आहे. याला ६०Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate) आणि २००० निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. प्रीमियम व्हर्जनमध्ये सॅफायर ग्लास, तर स्टँडर्ड व्हर्जनमध्ये एंटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह 2.5D टेम्पर्ड ग्लास दिला आहे. दोन्ही वर्जनमध्ये स्टेनलेस स्टील फ्रेम असून वजन अनुक्रमे २९.५ ग्राम (स्टँडर्ड) आणि ३१.६५ ग्राम (प्रीमियम) इतकं आहे.
ही स्मार्टवॉच Zepp OS 4.5 वर चालते आणि Zepp Flow Voice Control ला सपोर्ट करते. यामध्ये Bluetooth 5.2 कनेक्टिव्हिटी असून, ही Android 7.0+ आणि iOS 14.0+ डिव्हाइसेससोबत सुसंगत आहे. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि Amazon Alexa साठी माइक व स्पीकर दिले आहेत.
यामध्ये १६० पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स (Workout Modes) आहेत. यातील २५ स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि ८ स्पोर्ट्स मूव्हमेंट्सचे Auto Detection होते. Zepp Coach फिचर्समध्ये ट्रॅक रन मोड, स्मार्ट ट्रॅजेक्टरी करेक्शन, वर्च्युअल पेसर आणि रेस प्रेडिक्शन यांचा समावेश आहे.
आरोग्य तपासणीसाठी यामध्ये २४/७ हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस लेव्हल आणि रेडीनेस स्कोअर ट्रॅकिंगची सोय आहे. याशिवाय, To-do list, Calendar, Call alerts, App notifications, Music control, Camera control, Sedentary Reminder अशा स्मार्ट फीचर्सही दिल्या आहेत.
ही वॉच 5ATM वॉटर-रेसिस्टंट (Water Resistant) असून यामध्ये 270mAh बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी सामान्य वापरात १० दिवस, जास्त वापरात १० दिवस आणि बॅटरी सेवर मोडमध्ये १९ दिवस चालते.
किंमत आणि उपलब्धता
Amazfit Active 2 ही स्मार्टवॉच Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लॉन्चवेळी याची अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. याआधी ही वॉच यूएसमध्ये लॉन्च करण्यात आली होती, जिथे सिलिकॉन स्ट्रॅप असलेल्या वर्जनची किंमत $99 (सुमारे ₹8,600) आणि लेदर स्ट्रॅप असलेल्या वर्जनची किंमत $129.99 (सुमारे ₹11,000) होती.