celebrities

महाराष्ट्राच्या रिअल लाईफ सिंघमची आत्महत्या

मोठ मोठ्या हायप्रोफाईल केस मध्ये काम केलेले आणि यशस्वीपणे कामगिरी केलेले पोलीस अधिकारी अशी ओळख असणारे आणि तेवढेच रुबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्व असलेले माजी एटीएस प्रमुख

हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते, हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलासाठी ही धक्कादायक बातमी आहे. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस धसास लावल्या होत्या. हिमांशू रॉय यांनी अनेक मोठ मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जेडे मर्डर केस हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक केसेस पर्सनली मॉनिटर करत होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते, शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते, हिमांशू रॉय मागील एक दीड वर्षापासून मेडिकल लिव्हवर होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय विक होते, असंही सांगण्यात येत आहे.

तोंडात गोळी झाडून हिमांशू यांची आत्महत्या

हिंमाशू रॉय यांनी तोंडात गोळी झाडली, त्यांना तात्काळ उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता. हिमांशू रॉय यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर बरा होत होता, पण त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं, असंही त्याच्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं होतं. हिमांशू रॉय हे हाय प्रोफाईल केसेस उघड करण्याच्या बाबतीत नावारूपास आले होते.

हिमांशू रॉय नाशिकला होते तेव्हा ते वादात देखील आले होते. पत्रकार जेडी हत्या प्रकरणाचा छडा वेगाने लावण्यात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता.

हिमांशू रॉय यांच्याविषयी महत्वाचे…

हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे पोलीस अधिकारी

हिमांशू रॉय अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर (आस्थापन)

२०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्वाची कामगिरी

जेडे मर्डर हत्या प्रकरण

लैला खान हत्या प्रकरण

मिनाक्षी थापा हत्या प्रकरण

कसाब फाशी गोपनीयता

धाडसी अधिकारी, बॉडी बिल्डर अधिकारी

हनुमानाचे भक्त म्हणून ओळख


Show More

Related Articles

Back to top button