लग्न न करता पती-पत्नी प्रमाणे राहिले आहेत हे स्टार, 4 नंबरच्या जोडी बद्दल कदाचित विश्वास देखील बसणार नाही

0
45

बॉलिवूड एक अशी जागा आहे जेथे दररोज अनेक नाते बनतात आणि बिघडतात. पण लग्नाच्या बातम्या आणि एफेयर्स या कारणामुळे काही स्टार्स लग्नाच्या अगोदरच लिव-इन मध्ये राहिले आहेत. बॉलिवूड मध्ये जेवढे  तेवढेच लवकर ब्रेकअप देखील होत असल्याचे दिसून आले आहे. आज आपण बॉलिवूडच्या काही असे स्टार जोडपी बद्दल जाणून घेऊ जे लिव-इन मध्ये राहिली होती पण त्यांनी कधीही एकमेकांसोबत लग्न केलं नाही. चला जाणून घेऊ त्यांच्या बद्दल.

रणबीर कपूर आणि कैटरिना कैफ : हे दोघेही बॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार आहेत. यांनी अनके उत्तम चित्रपट देखील केले आहेत. यांच्या मधील प्रेम कोणाही पासून लपलेलं नाही. काही काळापूर्वी यांच्या लग्नाच्या बातम्या देखील येत होत्या. या लग्नाच्या बातम्यांच्या दरम्यान कैतरीना आणि रणबीर लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. बांद्रा मधील एका घरा मध्ये रणबीर कपूर आणि कैतरीना कैफ एकत्र राहत होते. नंतर रणबीर ने कैतरीनासाठी एक घर खरेदी केले होते. पण त्यानंतर असे काही झाले कि लग्न करण्याच्या ऐवजी ते कायमचे एकमेकांपासून वेगळे झाले.

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे : हे दोघेही पहिले टीव्ही वर काम करत होते. पण नंतर सुशांत सिंह राजपूत ने टीव्ही सिरीयल करणे सोडले आणि फिल्म करणे सुरु केले.सुशांत आणि अंकिता लिव इन मध्ये राहिले होते. या दोघांचा लग्नाच्या बातम्या देखील अधूनमधून येत होत्या पण यांचा अचानक ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

जॉन अब्राहम आणि बिपाशा बसु : जॉन आणि बिपाशा बऱ्याच मोठा काळ लिवइन मध्ये राहिल्या नंतर आपसात पटत नसल्याने वेगळे झाले. 2014 मध्ये जॉन ने आपली गर्लफ्रेंड रुचिता संचाल सोबत लग्न केलं. काही काळाने बिपाशा बसु ने एक्टर करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले.

अभय देओल आणि प्रिती देसाई : अभय देओल आता 42 वर्षांचा झाला आहे पण त्याने अजून लग्न केले नाही आहे. अभय देओलच्या लिव इन रिलेशनशिप बद्दल सगळ्यांना माहिती आहे. काही दिवस अगोदर अभय देओल प्रिती देसाई रिलेशनशिप मध्ये राहत होते. हे दोघे 2011 मध्ये न्यूयॉर्क मध्ये देखील एकत्र राहत होते.

राहुल देव आणि मुग्धा गोडसे : बॉलिवूड एक्टर राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या सगळ्यांना माहीत आहे. यांच्या मध्ये 18 वर्षांचे अंतर असूनही प्रेम आहे. बातमी नुसार हे आता एकत्र लिवइन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत. पण अजून यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही आहे.