health

रोजच्या वापरातील या 10 वस्तूंना पण असते एक्सपायरी डेट, तुम्हाला माहीती आहे का याबद्दल..

बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण त्याची एक्सपायरी डेट पाहून खरेदी करतो. पण काही वस्तूंवर त्यांची एक्सपायरी डेट नसते. परंतु काही त्याचा अर्थ असा नाही की त्या वस्तूला कोणतीही एक्सपायरी डेट नाही. चला तर अश्या काही वस्तू पाहू ज्यांची एक्सपायरी डेट बहुतेक लोकांना माहीत नसते.

1. टूथब्रश

सर्वात पहिले टूथब्रश बद्दल बोलूया ज्याचा वापर आपण दररोज करतो पण बरेचसे लोक असे आहेत ज्यांना माहीत नाही की टूथब्रशचा वापर किती दिवस केला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी कोणत्याही टूथब्रशचा वापर 3 महिन्या पर्यत केला पाहिजे. त्यानंतर नवीन टूथब्रश बाजारातून आणून त्याचा वापर केला पाहिजे.

2. हेयर ब्रश

हेयर ब्रश तर आपण दररोज वापरतो आणि दिवसातून अनेक वेळा वापरतो. त्यामुळे हे स्पष्ट आहे की नेहमीच्या वापरामुळे हेयर ब्रश लवकर घाण होतो. त्यामुळे यास दर आठवड्याला चांगले स्वच्छ धुवावे. जेव्हा हेयर ब्रश एक वर्ष जुना होईल तेव्हा त्यास बदलून नवीन आणावे.

3. ब्रा

महिलांच्या अंतर्वस्त्रा मध्ये ब्रा सर्वात महत्वपूर्ण आहे. जास्त दिवस वापरल्यामुळे ब्रा चा आकार बदलतो. हे लूज होतात यासाठी ब्रा लवकर बदली करावेत. ब्रा 1 किंवा 2 वर्षा पर्यंतचा चालू शकतात.

4. टॉवेल

दररोज अंघोळ केल्यावर टॉवेल वापरला जातो पण एका विशिष्ट काळा नंतर याचा वापर बंद करावा. टॉवेल मध्ये अनेक जर्म्स असतात यासाठी वेळोवेळी यास स्वच्छ धुतले पाहिजे आणि 1-3 वर्षापेक्षा जास्त वापरला नाही पाहिजे.

5. पैसिफायर

रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी पैसिफायर वापरला जातो. यास वेळोवेळी हलक्या गरम पाण्याने स्वच्ह केले पाहिजे. पण जर यामध्ये छिद्र झाले तर त्वरित वापर बंद करावा आणि नवीन खरेदी करावा. तसे ही पैसिफायर 2 महिन्या पेक्षा जास्त वापरू नये.

6. स्पंज

आजकाल प्रत्येकाच्या किचन मध्ये भांडी धुण्यासाठी स्पंज वापरला जातो पण काय तुम्हाला माहीती आहे की डिश स्पंज 2 आठवड्या पेक्षा जास्त वापरला नाही पाहिजे. डिश स्पंज मध्ये असलेले बैक्तीरीया मुळे टाइफाइड, फूड पोइजनिंग आणि पोटामध्ये इन्फेक्शन सारख्या समस्या होऊ शकतात.

7. स्लिपर्स

आता तुम्ही विचार करत असाल की स्लिपर्स वर पण काही एक्सपायरी असते का? उत्तर आहे होय असते, तुमच्या माहितीसाठी स्लिपर्स लवकर फंगल इन्फेक्शन पसरवते. यासाठी स्लिपर दर 6 महिन्या नंतर बदलून नवीन घ्याव्यात.

8. पावर सॉकेट

तसे तर पावर सॉकेटच्या बॉक्स वर कोणतीही एक्सपायरी डेट लिहिलेली नसते. पण याच्या दीर्घकाळ वापरा नंतर हे चांगले काम करत नाहीत. ज्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. यासाठी यांना 4-5 वर्षांनी बदलावे.

9. रनिंग शूज

जे लोक जास्त रनिंग करतात त्यांनी दीर्घकाळ एक जोडी शूजचा वापर नाही केला पाहिजे. कारण जास्त वापरामुळे यातील कुशनिंग खराब होते ज्यामुळे तुमच्या तळव्यावर जोर पडतो आणि यामुळे पायात वेदना होऊ शकतात. यासाठी यांना 1 वर्षाच्या वापरा नंतर बदलून नवीन घ्यावेत.

10. उशी

उशी कितीही जुनी झाली तरी काही लोक तिला सोडण्याचे नाव घेत नाहीत. पण असे करणे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. खरतर उशीच्या जास्त वापरामुळे तीचा आकार बदलतो. ज्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. यासाठी शहाणपण यातच आहे की दर 2-3 वर्षाने उशी जरूर नवीन घ्यावी.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्याने तुमच्या या आरोग्य समस्या दूर होतात, पहा कोणत्या आहेत या समस्या


Show More

Related Articles

Back to top button