डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील अभिनेत्री आहे; ‘या’ मालिकेत दोघांनी एकत्र काम केलंय

Kiran Gaikwad : लागिरं झालं जी, देवमाणूस (Devmanus)या तुफान गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड.

किरणला खरी ओळख आणि तुफान लोकप्रियता देवमाणूस या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्याने डॉक्टर अजितकुमार ही भूमिका साकारली आहे.

या मालिकेला मिळालेल्या यश आणि प्रेमामुळे त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु हा दुसरा भाग देवमाणूस मालिकेचा शेवट ठरला.

किरणच्या प्रोफेशन लाइफविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी आपण त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.

किरण गायकवाडचा जन्म आणि शिक्षण पुणे येथे झाला. कॉलेजमध्ये असताना, त्यांना अभिनयाची आवड होती, म्हणून त्यांनी अभिनय व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

किरणप्रमाणेच त्याची बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यकत आहे. किरणच्या बहिणीचं नाव योगिनी पोफळे आहे. योगिनी तिच्या सासरचं आडनाव लावते.

yogini pofale sister of kiran gaikwad

योगिनीने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

kiran gaikwad sister devmanus

योगिनी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.

kiran gaikwad devmanus 2

योगिनी आणि किरण गायकवाड यांनी लागिरं झालं जी या मालिकेत एकत्र काम केलं आहे. या मालिकेत तिने भैय्यासाहेबच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहेय

Follow us on

Sharing Is Caring: