astrologyPeople

शनिवारी चुकूनही या 6 वस्तू खरेदी करू नयेत, केल्यास कधीही श्रीमंत होणार नाहीत

ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या शनिवारी चुकूनही खरेदी करू नयेत. जर एखाद्या व्यक्तीने शनिवारी वर्जित करण्यात आलेल्या वस्तू खरेदी केल्यास त्याला शनीमुळे अडचणींना समोरे जावे लागू शकते. शनिवारचा कारक ग्रह शनी आहे.

शनीला न्यायाधीश मानले जाते म्हणजेच हाच ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. हा ग्रह कुंडलीत अशुभ झाल्यास कोणत्याही कामममध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही.

कात्री

जर तुम्ही शनिवारच्या दिवशी बाजारातून कात्रीची खरेदी करून घरामध्ये आणली तर तुमच्या कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता वाढते. घरातील वातावरण यामुळे दुषित होण्याची शक्यता आहे. शनिवारी कात्री खरेदी करणे टाळावे.

काळे तीळ

शनीदेवाशी संबंधीत असलेले काळे तीळ शनिवारी खरेदी करू नयेत. यामुळे तुमच्या अडचणी मध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते.

तेल खरेदी करू नये

तेल हे शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे आणि शनिवारी तेलाचे दान केले जाते. या दिवशी घरात तेल आणल्यामुळे घरात गरिबी प्रवेश करते आणि आजारपण वाढण्याची शक्यता निर्माण होते.

लोखंडाचे सामान

शनिवारी लोखंडापासून तयार झालेल्या वस्तू खरेदी करू नयेत. लोखंड हा शनीचा धातू आहे असे मानले जाते. या दिवशी लोखंडाच्या दानाला विशेष महत्व आहे. या दिवशी लोखंड खरेदी केल्यामुळे शनीदेवाच्या कोपाला सामोरे जावे लागू शकते.

मीठ खरेदी करू नये

शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी मीठ खरेदी केल्यास चालते पण शनिवारी मीठ खरेदी केल्यामुळे घरावर कर्जाचा डोंगर उभा राहतो.

बूट-चप्पल खरेदी करू नयेत

शनीदेवाला पायाचा कारक ग्रह मानले जाते. असे मानले जाते की शनिवारी चप्पल-बूट खरेदी केल्याने आजारपणाला सामोरे जावे लागू शकते.


Show More

Related Articles

Back to top button