astrology

मंगलवारच्या दिवशी चुकूनही करू नये ही कामे, अन्यथा होऊन जाल बर्बाद

धार्मिक मान्यते अनुसार आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. जसे कि मंगळवारचा दिवस देवीचा, गणपतीचा आणि हनुमानाचा मानला जातो. त्यामुळे अशी मान्यता आहे कि या दिवशी हनुमानाची पूजा अर्चना केल्याने ते भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडली मध्ये मंगल दोष आहे, त्यांच्यासाठी विशेषतः हनुमानाची पूजा लाभदायक ठरते. तर मंगळवारच्या दिवशी काही कार्य निषेध मानली जातात मान्यते अनुसार असे कार्य केल्याने मारुती भगवान रुष्ट होतात आणि फलस्वरूप याचे दुष्परिणाम भोगावी लागतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही कार्यांच्या बद्दल सांगत आहोत जी मंगळवारी केली नाही पाहिजेत. चला तर पाहू अशी कोणते कार्य आहेत जे मंगळवारी करणे अशुभ मानले जातात.

मंगळवारच्या दिवशी शृंगाराचे सामान खरेदी करणे अशुभ मानले जाते. मान्यता आहे कि मंगळवारच्या दिवशी शृंगाराचे सामान खरेदी करणे दाम्पत्य जीवनात समस्या निर्माण करतात. यामुळे पती-पत्नी मध्ये मनमुटाव आणि विवाद होतात. खरतर शृंगाराचे सामान खरेदी करण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे दिवस सर्वोत्तम मानले जातात.

मंगळवारच्या दिवशी उडद डाळीचे सेवन करू नये. खरतर ज्योतिष नुसार उडद शनी ग्रहाशी संबंधित वस्तू आहे, त्यामुळे मंगळवारी उडद खाण्यामुळे शनी-मंगळ संयोग आरोग्यासाठी कष्टकारी होऊ शकतो.

मंगळवारच्या दिवशी दाढी करणे देखील निषेध आहे. मंगळवारच्या दिवशी दाढी करणे असमय मृत्यूला बोलावण्या समान आहे. सोबतच असे केल्यामुळे मंगळदोष पण लागतो. तुमच्या माहितीसाठी दाढी करण्यासाठी सर्वोत्तम दिवस बुधवार मानला जातो.

मंगळवारच्या दिवशी नखे कापणे देखील अशुभ मानले जाते. मान्यता आहे कि मंगळवारच्या दिवशी नखे कापण्यामुळे जीवनात अनेक समस्या उत्पन्न होतात.

मंगळवारच्या दिवशी मोठ्या भावाच्या सोबत भांडण करणे किंवा विवाद करणे तुमच्यासाठी अनिष्टकारी होऊ शकते. खरतर ज्योतिष मध्ये मंगळाचा संबंध मोठ्या भावा सोबत मानला गेला आहे. त्यामुळे भावाच्या सोबत विवाद तुमचे मंगळ खराब करते. ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुर्घटना किंवा दुसरे काही मोठे संकट येऊ शकते. यामुळे कुटुंबातील सदस्याच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्यात कटुता येऊ शकते.

मंगळवारच्या दिवशी मांसाहार निषेध आहे. खास करून मंगळवारच्या दिवशी मच्छी बिल्कुल खाऊ नये. मान्यता आहे कि मंगळवारी मासे खरेदी केल्याने आणि खाण्यामुळे आर्थिक नुकसान होते आणि कमवलेले पैसे पाण्यासारखे वाहून जातात.

मंगळवारच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करणे शुभ मानले गेले आहे तर यादिवशी काळे वस्त्र परिधान करणे आणि खरेदी करणे दोन्ही निषेध आहे.

या सर्व कार्यांच्या व्यतिरिक्त मंगळवारी जमिनीचे खोदकाम करणे देखील निषेध आहे. मान्यता आहे कि असे केल्याने मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव मिळतो. खरतर ज्योतिष आणि धर्मानुसार मंगळ भूमिपुत्र मानला जातो. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी भूमी खोदणे योग्य नसते. एवढेच नाही तर यादिवशी घराचा पाया घेणे देखील अशुभ मानले जाते.


Show More

Related Articles

Back to top button