astrology

व्यापारा मध्ये होणारे नुकसान दूर करण्यासाठी करा हा तोडगा

लाख प्रयत्न करून देखील आपल्याला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल आणि आपला व्यवसाय डबघाईला येत असेल तर तुम्हाला खाली दिलेले तोडगे फायदेशीर ठरू शकतात. कारण अनेक वेळा वाईट वास्तुशास्त्र, लोकांची वाईट नजर आणि खराब ग्रहमान याकारणामुळे व्यापारामध्ये नुकसान सहन करावे लागते आणि हे नुकसान थांबण्याचे नाव घेत नाही. खाली दिलेले तोडगे केल्यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये होणारे नुकसान थांबवता येऊ शकते.

गोमती चक्र दुकानामध्ये ठेवा

गोमती चक्र हे शुभ मानले जाते आणि हे घरामध्ये असल्याने घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते. जर तुमचा व्यापार चांगला चालत नसेल तर तुम्ही 12 गोमती चक्र घेऊन त्यांना एक स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधावे आणि यांना आपल्या दुकान किंवा व्यापार असलेल्या स्थानी ठेवावे. याच प्रकारे आपण 12 गोमती चक्र लाल रंगाच्या कपड्या मध्ये बांधून आपल्या घ्ररातील`घरातील तिजोरी मध्ये देखील ठेवू शकता. गोमती चक्र ठेवल्याने आपल्या घरामध्ये आणि व्यापारामध्ये पैश्याची कमी राहणार नाही.

लिंबू कापणे

अनेक वेळा वाईट नजर लागल्याने आणि एखादा तोडगा केल्याने व्यापारात नुकसान होत राहते आणि अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील आपल्याला व्यापारामध्ये यश मिळत नाही. जर तुमच्या व्यवसायामध्ये देखील हीच अवस्था असेल तर आपण पाच लिंबू आपल्या दुकानात कापून त्यांना आपल्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या फेकून द्यावे. लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला फक्त रविवारच्या दिवशीच करायचा आहे. जर तुमच्या व्यापाराला वाईट नजर लागली असेल किंवा एखाद्याने काही तोडगा केला असेल तर हा उपाय केल्याने त्याचा प्रभाव संपतो आणि आपल्याला व्यापारामध्ये फायदा होऊ लागतो.

काळी मिरी आणि पिवळी राई (मोहरी)

एका कपड्यामध्ये समान प्रमाणात काळी मिरी आणि पिवळी राई दोन्ही घ्यावेत आणि या कपड्याला आपल्या दुकानात ठेवावे. या कपड्याला दुकानात ठेवल्याच्या एका दिवसानंतर हे कापड आणि त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू एखाद्या निर्जन स्थानी फेकून द्यावे. असे केल्यानंतर आपल्याला प्रत्येक कार्य ज्यामध्ये अपयश मिळत होते त्यामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल.

नारळाची पूजा करावी

आपण आपल्या दुकानांमधील तिजोरी मध्ये एक नारळ ठेवा आणि रोज या नारळाची पूजा करा. या नारळाची पूजा केल्यामुळे आपला व्यापार एकदम चांगला चालण्यास सुरुवात होईल. आपण हा नारळ दोन महिन्यानंतर शुभ दिवशी आणि वेळी बदलून नवीन नारळ त्या स्थानी ठेवावा.

अन्नदान करावे

खाण्याच्या वस्तू जसे पोळी, डाळ, भात इत्यादी दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते. जर गरिबांना या वस्तू दान दिल्यातर त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि परमेश्वर आपल्या वाईट कार्याबद्दल आपल्याला क्षमा करतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा आपण गरिबाला अन्नदान केले पाहिजे ज्यामुळे त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि आपल्या व्यापारामध्ये त्याचा लाभ होईल.


Tags
Show More

Related Articles

Back to top button