money

धनाचे 5 नियम (भाग पहिला)

धनाचे (पैश्यांचे) नियम, ऐकून थोडे विचित्र वाटले असेल कदाचित. होय असे नियम आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत. हे नियम म्हणजे काही काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही परंतु जुन्या काळातील श्रीमंत लोकांनी सांगितलेले हे नियम आहेत. या नियमांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परस्थिती मध्ये आचरणात आणून ते किती प्रभावी आहेत याचा अनुभव घेतलेला आहे.

इकडे लक्ष द्या :

धनाचे 5 नियम भरपूर जुने आहेत, आज देखील अत्यंत प्रभावशाली आहेत, जेवढे ते जुन्या काळात होते. आजची ही पोस्ट अत्यंत काळजीपुर्वक वाचा आणि हिचा फायदा घ्या. हि पोस्ट तुमच्या जीवनाला नक्कीच सकारात्मक कलाटणी देईल असा आम्हाला विश्वास आहे. चला पाहू धनाचे 5 नियम सविस्तर.

धनाचा पहिला नियम

धनाचा पहिला नियम आपल्याला नियमित, निश्चित आणि अनुशाषित बचत करण्या बद्दल शिकवतो.

आणि हा नियम सांगतो कि

  1. धन त्याच व्यक्तीकडे आनंदाने येतो, आणि वाढत्या प्रमाणात येतो, जो व्यक्ती आपल्या कमावलेल्या धना मधील कमीतकमी 10 व्या भागाचा वापर आपल्या तसेच आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी संपत्ती बनवण्यासाठी करतो.

हा नियम अगदी सोप्पा आहे, पण नियमाचा सर्वात महत्वाचा भाग हा आहे कि – तुम्ही आपल्या उत्पन्ना मधून जेवढी पण बचत करू इच्छिता, मंग ती 10% असो किंवा 20% किंवा त्यापेक्षा जास्त.

फक्त तुम्हाला रेग्युलर आणि अनुशाषित पद्धतीने without फेल बचत करत रहायचे आहे.

असे नाही कि तुम्ही 5 महिने बचत केली आणि नंतर काही महिने बचत करणे सोडले.

आणि नंतर पुन्हा काही महिन्या नंतर पुन्हा बचत सुरु करण्याचा विचार करू लागले.

प्रत्येक्षा मध्ये.

आपल्या पैकी बहुतेक लोक ज्यांच्या जवळ पैसे टिकत नाहीत, ते काहीसे असेच करतात, ते पैश्यांची बचत सुरु तर करतात परंतु आपल्या बचत करण्यामध्ये अनुशाषित राहत नाहीत.

ज्यामुळे त्यांच्या जवळ पैसे टिकत नाहीत आणि यामुळे त्यांच्या जवळ पैसे येतात आणि पुन्हा परत जात राहतात.

लक्षात ठेवा : हा सोप्पा नियम अमलात आणण्यासाठी तुम्हाला आपली कमाई खर्च करताना आपल्या भावनांना नियंत्रित कराव्या लागतील आणि सवयी वर लगाम घालावा लागेल.

तर चला आता पाहू – धनाचा दुसरा नियम काय सांगतो

धनाचा दुसरा नियम

हा नियम बचत केलेल्या पैश्यांसाठी चांगल्या गुंतवणुकीचे विकल्प शोधण्या बद्दल आहे. ज्यामुळे तुम्ही आपल्या बचत केलेल्या पैश्यांना वाढवू शकाल.

आणि अश्या प्रकारे धनाचा दुसरा नियम सांगतो कि –

2. धन त्या समजदार मालकासाठी भरपूर मेहनत करतो, जो त्यासाठी लाभकारक काम शोधतो, हा पाळीव प्राण्यांसारखा वेगाने वाढतो.

धनाचा हा नियम हे सांगतो कि – तुम्हाला फक्त पैश्यांची बचतच नाही करायची आहे तर तुम्हाला बचत केलेले पैसे चांगल्या प्रकारे गुंतवणूक देखील केले पाहिजे.

तुम्ही आपल्या पैश्यांना एखाद्या मोठ्या वृक्षाचे बीज समजू शकता. बचत केलेले पैसे तुम्हाला कमी वाटू शकतात पण लक्षात ठेवा मोठ्यातील मोठ्या वृक्षाचे बीज देखील अगदी लहान असते.

तुम्ही आपले बचत केलेले पैसे चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून यांना वाढवू शकता आणि हे देखील लक्षात घ्या.

कि ज्याप्रकारे एखादे रोपटे एका दिवसातच वृक्ष होत नाही. त्यास वेळ लागतो.

तुम्ही आज रोपटे लावले आणि उद्या फळाची अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. तुम्हाला समजायला पाहिजे कि –

“लवकर येणारी धन दौलत लवकरच निघून जाते.”

पण आपल्या मालकाला आनंद आणि संतुष्टी देणारी स्थायी संपत्ती हळूहळू येते. कारण हे ज्ञान आणि सततच्या संकल्पाचे फळ असते.

आणि यामुळे गुंतवणूक केलेले पैसे हळूहळू वाढतील. तुम्हाला आपल्या धनाची गुंतवणूक भरपूर वाढवण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

यामुळे या नियमानुसार

जेव्हा तुम्ही एकदा धन वाचवणे सुरु करता तेव्हा तुम्हाला त्या वाचवलेल्या धना पासून अजून धन कमावण्यासाठी आपल्या पैश्यांना सुरक्षितता लक्षात घेऊन चांगल्या गुंतवणूक ठिकाणाचा शोध घेतला पाहिजे.

तर चला आता पाहू धनाचा तिसरा नियम काय सांगत आहे.

धनाचा तिसरा नियम

धनाचा तिसरा नियम धनाच्या मालकास सावधानीपूर्वक गुंतवणूक करण्या बद्दल शिकवतो आणि सोबतच गुंतवणूक केलेले पैश्यांची सुरक्षितता आणि गुंतवणुकीतील अनुभवाचे महत्व सांगतो.

धनाचा तिसरा नियम हे सांगतो

3. धन त्या सावधान मालकाच्या संरक्षणात राहतो, जो त्याची गुंतवणूक फक्त समजदार लोकांचा सल्ला घेऊन करतो.

धनाचा सावधान मालक कोणासही धन उधार देण्याच्या अगोदर किंवा कोणत्याही गुंतवणुकीच्या अगोदर हि गोष्ट सुनिश्चित करतो कि त्याचे मुळधन सुरक्षित राहील आणि त्याचे उधार दिलेले किंवा गुंतवणूक केलेले पैसे लालच किंवा निष्काळजीपणामुळे बुडणार नाहीत.

आणि या नियमाच्या आधारावर जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आणि श्रीमंत व्यक्ती वारेन बफे यांनी गुंतवणुकीचा एक नियम सांगितला आहे-

आणि तो नियम असा आहे कि –

गुंतवणुकीचे दोन नियम आहेत –

पहिला – आपले पैसे (मुद्दल) कधी गमवू नये,

दुसरा  – पहिला नियम कधी विसरू नये

लक्षात घ्या

धनाच्या या तिसऱ्या नियमाचा अर्थ हा देखील आहे कि-

धनाच्या मालकाला अधिक जास्त सावधान राहिले पाहिजे आणि हिसाब किताब चे महत्व नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

आणि हिशोब ठेवताना कधीही निष्काळजीपणा केला नाही पाहिजे. तुम्ही कोणाला किती धन देत आहात, का देत आहेत, हे सर्व अत्यंत विचारपूर्वक केले पाहिजे. हा विचार करताना भावनांच्या आहारी जाता कामा नये.

आता पर्यंत आपण धनाचे तीन नियम पाहिले आहेत जे अगदी सोप्पे आहेत उर्वरित पुढील दोन नियम पुढील पोस्ट मध्ये पाहू.

तुम्हाला जर धनाचे हे नियम फायदेशीर वाटत असतील तर पोस्टला लाईक आणि शेयर करून आमचा उत्साह वाढवण्यास विसरू नका ज्यामुळे पुढील उर्वरित दोन नियम तुमच्या सोबत शेयर करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल.


Show More

Related Articles

Back to top button