Connect with us

प्रत्येक व्यक्तीने दररोज केली पाहिजेत ही 5 कामे, असे केल्याने पूर्ण दिवस जातो प्रसन्न

Dharmik

प्रत्येक व्यक्तीने दररोज केली पाहिजेत ही 5 कामे, असे केल्याने पूर्ण दिवस जातो प्रसन्न

जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट असेल तर ती गोष्ट आहे सुखी जीवन आणि आनंद. व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी कशाचीही गरज नसते. आनंद हा आतून येतो. जर व्यक्ती आपल्या जीवना मध्ये चांगले कर्म करतो तर त्यास आतून आनंद मिळतो. वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळत नाही आणि त्याला आतून संकोचलेपणाची भावना सतावत असते. पण असे लोक नेहमी आपण किती आनंदी आहोत याचा देखावा मात्र करत असतात. जीवनात खरा आनंद आणि सुख मिळवण्यासाठी चांगले कर्म करणे आवश्यक आहेत. जो व्यक्ती चांगले कर्म करत तो स्वता आनंदी राहतो.

व्यक्तीला मिळते प्रत्येक कामामध्ये यश

हिंदू धर्मशास्त्रा अनुसार व्यक्तीने जीवनामध्ये दररोज काही काम केले पाहिजेत. यामुळे ईश्वराचे आशीर्वाद मिळतात, सोबतच व्यक्तीचा आनंद मिळतो. व्यक्ती पूर्ण दिवस प्रसन्न राहतो. गरुड पुराणच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज आपल्या आयुष्यात 5 कामे समाविष्ट केली पाहिजेत. जे लोक हे पाच कामे करत नाहीत त्यांचे जीवन अर्धवट मानले जाते. दररोज हे कामे करणाऱ्या लोकांचा दिवस शुभ जातो आणि त्यांनी त्यादिवशी केलेली कामे यशस्वी होतात.

ही कामे दररोज केली पाहिजेत

अंघोळ (स्नान)

स्नान करणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. दररोज अंघोळ केल्यामुळे व्यक्तीचे फक्त शरीर स्वच्छ राहते असे नाहीत तर त्याच सोबत मन देखील उत्साहित आणि चांगले राहते. यासाठी असे मानले जाते कि दिवसाची सुरुवात स्नान करून केली पाहिजे. जो व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात स्नान करून करतो, त्याच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने आणि उर्जेने होते त्यास आपल्या कामामध्ये यश मिळते.

दान

हिंदू धर्मामध्ये दान देण्याचे महत्व भरपूर आहे. दान देणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. शास्त्रा मध्ये सांगितले गेले आहे कि प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्थिती अनुसार काही ना काही दान आवश्य केले पाहिजे. असे करणाऱ्या व्यक्तीच्या जीवना मध्ये कधीही धनाची कमी होत नाही आणि त्याचा परिवार नेहमी सुखी राहतो.

हवन करणे किंवा दिवा लावणे

जीवनामध्ये सुख आणि शांती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज हवन केले पाहिजे जर दररोज हवन करणे शक्य नसेल तर कमीतकमी दररोज तुळशी समोर दिवा आवश्य लावला पाहिजे.

जप

सकाळच्या वेळी प्रत्येक व्यक्तीने मंत्र जप केला पाहिजे. यामुळे मनशांती मिळते. असे मानले जाते कि जी व्यक्ती पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जप करते त्या व्यक्तीला कधीही अपयश येत नाही.

देवपूजा

दररोज आपले स्नान झाल्यानंतर देवी-देवतांची पूजा केली पाहिजे. परमेश्वराची पूजा केल्या नंतर त्यांना नैवेद्य द्यावे. असे केल्यामुळे व्यक्ती वर परमेश्वराची कृपा राहते आणि कुटुंबावर येणारी संकटे नेहमी दूर राहतात.

More in Dharmik

Trending

To Top