health

नाकातील केस कापता तर नक्की वाचा

आपल्या शरीरा मध्ये अश्या अनेक क्रिया होत असतात ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि त्या क्रिया समजल्या तर त्यांच्या बद्दल आपल्याला आश्चर्य होते. या पैकीच एक आहे शरीरावर केसांचे उगवणे. शरीरावरील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे केस उगवतात. काही भागावर जास्त केस असतात तर काही ठिकाणी विरळ असतात. आणि आश्चर्याची गोष्ट ही कि केस कापल्यावर काही दिवसातच पुन्हा ती उगवतात.

शरीरावरील आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस सगळ्यांनाच नकोनकोसे असतात. काही लोक कैची वापरून हे नको असलेले केस कापून टाकतात. काही लोकांना आपल्या नाका मधील केस देखील नको असतात आणि ते कैचीने कापून टाकतात. पण असे करणे चुकीचे असते.

नाकातील केस कापणे नुकसानदायक का असते?

काही लोकांना नाकातील केस वाईट आणि घाणेरडे वाटतात त्यामुळे असे लोक सरळ कैची वापरून हे केस कापतात. पण असे करणे अतिशय नुकसानदायक असते. असे केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांमध्ये टाकू शकते. असे मानले जाते कि नाका मधील केस आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. नाकाच्या केसामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

श्वास घेताना हवेतील धूळ-माती आपल्या नाकामध्ये प्रवेश करतात. हे कण नाकातील केसांमध्ये अडकतात. या प्रक्रीयेमुळे आपले अनेक आजारा पासून संरक्षण होते. जर तुम्ही नाकाचे केस कापले तर हवेतील धूळ-माती तुमच्या शरीरा मध्ये प्रवेश करतात. नाका मधील केस हवेमधील धूळ-माती आणि सूक्ष्म जीव गाळण्याचे काम करतात ज्यामुळे ते आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. हेच कारण आहे ज्यामुळे आपण नाकातील केस कापले नाही पाहिजेत.

नाक स्वच्छ करण्यासाठी टिप्स

आपल्या घरा मध्ये जास्त धूळ-माती साठून देऊ नका.

दररोज घराची स्वच्छता करा.

मोईश्चरने देखील नाकाची स्वच्छता केली जाऊ शकते. आठवड्यातून दोन वेळा हलकी वाफ घ्या यामुळे नाक स्वच्छ करणे सोप्पे जाईल.

नाकाची स्वच्छता आणि आरोग्यासाठी धुम्रपान करून नका.

भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ सेवन करा ज्यामुळे शरीरात पाण्याची कमी होणार नाही. यामुळे देखील नाक स्वच्छ ठेवण्यास मदत होते.


Show More

Related Articles

Back to top button