money

या सीमे पेक्षा जास्त कैश देणे-घेणे केल्यास आयकर विभाग दंड लावणार, या परस्थिती मध्ये मिळेल सूट

रोख रक्कम म्हणजेच कैशच्या देणे-घेणे केल्यास आयकर विभाग सक्त झाला आहे. आता 20 हजार रुपयांपेक्षा जास्त कैश घेणे-देणे केल्यास तुम्हाला दंड तर द्यावाच लागेल सोबत कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आयकर विभाग चौकशी देखील करू शकतो.

एवढा लागेल दंड 

इनकम टैक्स च्या सेक्शन 269 एस एस, 269 टी च्या अंतर्गत जर कोणीही 20 हजार रुपये पेक्षा जास्त कैश मध्ये लोन देतो किंवा घेतो तर त्याला तेवढ्याच रक्कमे एवढा दंड द्यावा लागेल.

हे देणे-घेणे राहतील नजरेत 

असे समजा कि तुम्ही घर किंवा दुकान भाड्याने घेतली आहे आणि त्याचे मासिक भाडे एका वर्षाचे 20 हजार रुपये पेक्षा जास्त आहे. जर तुम्ही या भाड्याचे देणे कैश मध्ये केले तर आयकर विभाग तेवढ्याच रुपयांचा दंड तुमच्यावर लावू शकतो.त्याच सोबत कैश मध्ये लोन देणे-घेणे, एडव्हान्स देणे, डिपॉजिट देणे-घेणे बेकायदेशीर आहे.

या लोकांना मिळेल सूट 

आयकर विभागाने काही लोकांना या नियमा मध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमा प्रमाणे आई/वडील-मुलगा/मुलगी, पती/पत्नी, भाऊ-बहीण यासारख्या नात्यांमध्ये देणे-घेणे 20 हजार रुपया पेक्षा जास्त केले जाऊ शकते. जर एखादा पती दूर शहरात राहून नोकरी करत आहे आणि आपल्या पत्नी, आई-वडील आणि मुलांना घर खर्च करण्यासाठी पैसे पाठवत असेल, तर त्यास याबाबतीत या नियमा मधून सूट मिळेल.

Tags
Show More

Related Articles

Back to top button