dharmik

गरुड पुराणातील या गोष्टी लक्षात ठेवल्यातर, आयुष्यात धावतपळत येईल यश, मिळेल सौभाग्य

असे अनके लोक आहेत ज्यांना गरुड पुराणातील गोष्टींबद्दल माहिती असेल. गरुड पुराणामध्ये स्वर्ग नरक पाप पुण्य याच्या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी सांगतो. यामध्ये ज्ञान-विज्ञान निती नियम आणि धर्म यांच्या बद्दल देखील सांगितले आहे. एकीकडे जेथे व्यक्तीचे आयुष्य संपल्या नंतरच्या रहस्या बद्दल सांगितले आहे तर दुसरीकडे व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य देखील सांगितले आहे. गरुड पुराण भगवान विष्णूच्या भक्ती आणि ज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीने हे पुराण आवश्य वाचले पाहिजे. गरुड पुराण हे हिंदू धर्मामधील प्रसिध्द धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. गरुड पुराणामध्ये व्यक्तीच्या जीवनासंबंधी अत्यंत महत्वाची माहिती सांगितलेली आहे ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत.

आज या लेखाच्या माध्यमातून आपण गरुड पुराणातील काही अश्या माहिती बद्दल माहिती घेणार आहोत ज्यांना जर आपण प्रत्येक्ष जीवनात अमलात आणल्यातर आपण जीवनात अपयशी होणार नाही. या गोष्टींना लक्षात ठेवून आपण आपली प्रगती करू शकतो.

संयम आणि सतर्कता

गरुड पुराणाच्या अनुसार शत्रूवर विजय मिळवण्यासाठी सतर्कता आणि चतुरता असणे आवश्यक आहे. शत्रू नेहमी आपणास हानी करण्याचा प्रयत्न करेल अश्या स्थितीमध्ये जर आपण चतुरता दाखवली नाही तर आपणास नुकसान झेलावे लागू शकते. त्यामुळे जसा शत्रू आहे त्याप्रमाणे आपली निती वापरून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

कपडे स्वच्छ आणि सुगंधी असावेत

जर व्यक्तीला श्रीमंत होण्याची इच्छा आहे आणि त्याला आपले भाग्य साथ द्यावे असे वाटत असेल तर त्यासाठी स्वच्छ आणि सुगंधित कपडे परिधान केले पाहिजेत. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती अस्वच्छ कपडे परिधान करतो त्याचे सौभाग्य नष्ट होते. ज्याघरामध्ये असे लोक असतात जे अस्वच्छ कपडे परिधान करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. घरातून सौभाग्य निघून जाते आणि दारिद्र्य वास करते. त्यामुळे आपण स्वच्छ आणि सुगंधित कपडे परिधान केले पाहिजेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील व आपली कृपा आपल्यावर करेल.

निरोगी शरीर

जर आपण संतुलित आहार सेवन करत असलो तर आपले शरीर निरोगी राहते. संतुलित आहार घेतल्यामुळे एक चांगले आरोग्य मिळवले जाऊ शकते आणि आजारांपासून दूर राहता येऊ शकते. अन्न हे आपल्या शरीरासाठी उर्जेचे मुख्य स्त्रोत आहे. आपल्याला अर्ध्याहून जास्त आजार हे असंतुलित आहारामुळे होतात. ज्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित कार्य करत नाही त्यामुळे आपल्या पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार केला पाहिजे. यामुळे आपण रोगांपासून दूर राहू.

तुळशीचे महत्व

गरुड पुराणाच्या सोबत अनेक पुराणामध्ये तुळशीचे महत्व सांगितले गेले आहे. जर तुळशी घरामध्ये असेल तर अनेक आजारा पासून दूर राहता येऊ शकते. दररोज तुळशीचे सेवन करणे शरीराला अनेक आजारापासून दूर ठेवते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button