astrology

अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी खरेदी करा या 6 वस्तू, माता लक्ष्मी करेल कृपा

पुराणा मध्ये माता लक्ष्मीच्या उत्पत्ती बद्दल विरोधाभास आहे. एक कथा माता लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाल्याचे सांगते तर दुसरी कथा भगवान विष्णूची पत्नी असल्याचे सांगते परंतु सत्यतर हे आहे की माता लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाली होती आणि भगवान विष्णू सोबत त्यांचा विवाह झाला होता.

जसेकी आपल्याला माहीत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले शुभ काम कायमस्वरूपी चांगले फळ देते. यादिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण यादिवशी केलेले प्रत्येक कार्य अनंत काळा पर्यत आपल्याला फळे देतात म्हणूनच त्यास अक्षय असे बोलले जाते. आज आपण पाहू अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल.

असे मानले जाते की अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने चांदी खरेदी करावे आणि घरी घेऊन यावे हे शुभ मानले जाते. कारण सोने चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा चांदीची माता लक्ष्मीची पादुका घरी आणून नियमित रूपाने पूजन केले तर जीवनात यशस्वी होण्याचे योग होतील.

कवडी रुपी वस्तू माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत त्यामुळे जर नियमित रूपाने हळद आणि केसर सोबत माता लक्ष्मीची नियमित पूजा केली गेली तर तुमच्या जीवनावर शुभ प्रभाव पडेल.

एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे यासाठी ते मातेस प्रिय आहे. अक्षय तृतीयवर एकाक्षी नारळ मातेला अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी पारदच्या देवीची मूर्ती घेऊन येणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते लक्ष्मी स्वरूप असते आणि घरामध्ये आगमन होण्यामुळे घरातील धनाचा अभाव दूर होतो.

श्रीयंत्र, स्फटिक यंत्र आणि कासव मातेला प्रिय आहेत. महालक्ष्मी जेथे वास्तव्य करते तेथे या वस्तू होणे आवश्यक आहे यासाठी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी या सर्व वस्तू घरामध्ये असणे आवश्यक मानले जाते. यासर्व वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला सर्वात प्रिय वस्तू आहे. यास अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी घेऊन आल्यामुळे धन वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते.


Show More

Related Articles

Back to top button