Urban Company IPO Allotment Status: ऑनलाइन होम सर्विस देणाऱ्या Urban Company च्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून आज (सोमवार) शेअर्सचे अलॉटमेंट जाहीर होणार आहे. जर तुम्हीही या IPO साठी अर्ज केला असेल, तर अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी येथे सर्व माहिती स्टेप-बाय-स्टेप दिली आहे.
NSE वर अलॉटमेंट स्टेटस कसे पाहावे
NSE च्या अधिकृत IPO अलॉटमेंट वेबसाइट https://www.nseindia.com/invest/check-trades-bids-verify-ipo-bids येथे लॉगिन करा
Equity & SME IPO bid details वर क्लिक करून “URBANCO” सिलेक्ट करा
तुमचा PAN नंबर किंवा Application Number टाकून SUBMIT बटणावर क्लिक करा
त्यानंतर स्क्रीनवर तुमचे अलॉटमेंट स्टेटस दिसेल

Urban Company IPO Allotment Status
MUFG Intime India वर अलॉटमेंट स्टेटस कसे पाहावे
MUFG Intime India ची अधिकृत वेबसाइट https://in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html उघडा
Select Company मध्ये Urban Company निवडा
PAN, Application Number, DP/Client ID किंवा Account No/IFSC यापैकी कोणताही पर्याय निवडून तपशील भरा
Submit वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर अलॉटमेंट स्टेटस मिळेल
IPO ला मिळाला प्रचंड प्रतिसाद
NSE च्या आकडेवारीनुसार Urban Company IPO ला तब्बल 103.63 पट सब्स्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनी या IPO द्वारे एकूण 1900 कोटी रुपये उभारणार आहे. दरम्यान, प्रत्येक शेअरची किंमत 98 ते 103 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली होती आणि अलॉटमेंट 103 रुपयांवर होणार आहे.
या अंतर्गत 472.00 कोटींचे 4,58,25,242 फ्रेश शेअर्स जारी केले जातील तर 1,428.00 कोटींचे 13,86,40,776 शेअर्स OFS मार्गे विकले जातील. कंपनीचे शेअर्स बुधवार, 17 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची सूचना
Urban Company चा हा IPO प्रचंड मागणीमुळे गुंतवणूकदारांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जर तुम्ही अर्ज केला असेल तर आजच अलॉटमेंट तपासा आणि पुढील गुंतवणूक निर्णयासाठी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.
Disclaimer:
ही माहिती फक्त माहितीपर उद्देशासाठी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.








