देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरच एक मोठी खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घर, गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर त्यांचे दर कमी होऊ शकतात. कारण भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करेल अशी शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीत रेपो दरात 25 आधार अंक (BPS) कपात करण्याची घोषणा करू शकते. भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या एका अहवालात ही बाब म्हटली आहे. 6 ऑगस्ट रोजी धोरणाची घोषणा होणार आहे.
रेपो रेटमध्ये कपात: सणांच्या आधीची मोठी बातमी
या वर्षात RBI ने आधीच 3 वेळा आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली आहे. फेब्रुवारीत 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. एप्रिलमध्येही 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. जुनमध्ये RBI ने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. त्यामुळे आतापर्यंत रेपो रेटमध्ये 1% कपात झाली आहे.
सणांपूर्वीच्या गुड न्यूजची शक्यता
SBI रिसर्चच्या अहवालानुसार, RBI MPC बैठकीत रेपो रेट कमी करून रिझर्व्ह बँक लोन घेणाऱ्या लोकांना भेट देऊ शकते. जर हा रेट कट झाला तर क्रेडिट ग्रोथला आर्थिक वर्ष 26 च्या सणाच्या हंगामाच्या आधी मोठा बूस्ट मिळेल. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या, सणाच्या हंगामाच्या आधी व्याज दरांमध्ये कपात केल्यास क्रेडिट ग्रोथला मोठा बूस्ट मिळतो.
रेपो रेट कपात: लोन स्वस्त परंतु FD गुंतवणूकदारांना तोटा
जर यावेळी रेपो रेटमध्ये कपात झाली तर लोकांना सणांपूर्वी खुशखबरी मिळेल आणि लोकांसाठी कर्ज घेणे स्वस्त होईल. मात्र, रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे FD गुंतवणूकदारांना नुकसान होईल.
अहवालातील दावे
अहवालात म्हटले आहे की ऑगस्ट 2017 मध्ये रेपो रेटमध्ये 25 आधार अंकांची कपात करण्यात आली होती. यामुळे दिवाळीच्या अखेरपर्यंत 1,956 अब्ज रुपयांची अतिरिक्त क्रेडिट वाढ झाली. त्यात वैयक्तिक कर्जाचा सुमारे 30% वाटा होता. तसेच अहवालात म्हटले आहे की दिवाळी, भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने ग्राहक खर्चात वाढ दिसते आणि दिवाळीपूर्वी कमी व्याज दराचे वातावरण कर्ज मागणीला सुधारण्यात मदत करते.
तुम्ही गृहकर्ज किंवा कोणतेही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर RBI च्या या संभाव्य रेपो रेट कपातीचा फायदा घेण्यास तत्पर राहा. मात्र, FD गुंतवणुकीवर आधारित उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या गुंतवणूक योजनांमध्ये बदल करण्याची गरज भासू शकते.
डिस्क्लेमर: वरील माहिती आर्थिक धोरणांवरील अंदाजांवर आधारित आहे आणि ती वेळोवेळी बदलू शकते. गुंतवणूक किंवा कर्ज घेण्यापूर्वी व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घ्या.









