PM Kisan Yojana 20th Installment Release Date 2025: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी थेट खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्रालयानं याबाबत अधिकृत घोषणा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एका विशेष कार्यक्रमातून हा हप्ता जारी करणार आहेत.
किती पैसे मिळतात? योजना नेमकी आहे तरी काय?
PM-KISAN ही केंद्र सरकारची योजना असून यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दर तीन महिन्यांनी 2,000 रुपये या स्वरूपात थेट खात्यात (DBT) ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत योजनेच्या 19 हप्त्यांचा लाभ 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे.
यावेळी बदल काय? e-KYC आणि आधार लिंक नसेल, तर नुकसान!
या वेळी केंद्र सरकारनं ई-केवायसी (e-KYC) आणि आधार कार्ड व बँक खात्याची लिंकिंग अनिवार्य केली आहे. जर कोणतीही माहिती चुकीची असेल किंवा अद्ययावत नसेल, तर तुमची हप्ता थांबवली जाऊ शकते. त्यामुळे 2 ऑगस्टपूर्वीच सर्व कागदपत्रं तपासून खात्री करावी लागेल.
तुमचं नाव यादीत आहे का? असं करा हप्त्याचं स्टेटस चेक
तुमचा हप्ता जमा झाला आहे का, हे पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- pmkisan.gov.in ला भेट द्या
- “Beneficiary Status” वर क्लिक करा
- आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक अकाउंट नंबर टाका
- “Get Data” वर क्लिक करा
जर Payment Success असं स्टेटस दिसलं, तर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे. अन्यथा e-KYC incomplete, bank detail चुकीची, किंवा Aadhaar not linked असा त्रुटी मेसेज दिसेल.
पैसे अडकले? मग हे करा, नाहीतर हप्ता हुकणार!
जर 2 ऑगस्टनंतरही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा CSC सेवा केंद्र येथे संपर्क साधा. तुमचे जमिनीचे कागदपत्र, आधार, बँक डिटेल्स योग्य आहेत याची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करा.
9.8 कोटींना मिळालेला लाभ – तुमचं नाव मागे पडतंय का?
या योजनेत आतापर्यंत देशातील सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला आहे. जर तुम्ही अद्याप e-KYC पूर्ण केलेलं नसेल किंवा बँक डिटेल्समध्ये गडबड असेल, तर तुमचं नाव हप्त्याच्या यादीत नसेल. यामुळे तात्काळ अपडेट करणं गरजेचं आहे.
सरकारनं काय म्हटलं? अधिकृत लिंक आणि प्रेसनोट इथे पहा
- PM-KISAN अधिकृत वेबसाइट
- कृषी मंत्रालय – भारत सरकार
- प्रेस रिलीज: PIB India (अपेक्षित)