PM Kisan 21st Installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर येऊ घातली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये मिळतात — म्हणजे तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये.
या वेळेस काही राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा झालेत, पण देशभरातील लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. माध्यमांनुसार केंद्र सरकार लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करणार आहे.
21वी हप्ता तीन राज्यांना आधीच मिळाला या वर्षी 26 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने विशेष निर्णय घेत, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांना 21वा हप्ता पाठवला. या राज्यांमध्ये अलीकडे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सरकारने त्यांना प्राधान्य दिले. बाकी राज्यांतील शेतकऱ्यांना मात्र पुढील काही दिवसांत पैसे मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी आपले PM Kisan खाते आणि बँक खाते तपशील अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून निधी वेळेवर मिळेल.
योजनेचा उद्देश काय? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीवरील खर्चात मदत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे जमिनीच्या मालकीचे अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
20वा हप्ता कधी आला होता? या योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून 9.71 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली होती. त्याचा सर्वाधिक फायदा बिहारमधील 75 लाख शेतकऱ्यांना झाला होता.
गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार, सरकार ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानच हप्ते जारी करते. यंदा दिवाळी 20 ऑक्टोबरला असल्याने, सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा आनंदाचा हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे.
बिजनेस न्यूज वाचण्यासाठी दररोज व्हिजिट करा.









