Personal loan hidden charges: पर्सनल लोन जे तातडीच्या खर्चासाठी त्वरित मिळणारा आधार. पण फक्त व्याजदर पाहून घेतलेला निर्णय पुढे मोठा आर्थिक बोजा बनू शकतो. पर्सनल लोन स्वस्त की महाग, याचा खरा अंदाज त्यातील लपलेल्या खर्चांवरूनच ठरतो. त्यामुळे कर्ज घेण्याआधी त्याची संपूर्ण रचना समजून घेणे आवश्यक आहे.
व्याजदरात छोटा फरक, पण खर्चात मोठी वाढ
₹5 लाखांचे कर्ज 11% व्याजदराने 3 वर्षांसाठी घेतल्यास साधारण ₹89,296 इतका व्याज खर्च येतो. पण हाच व्याजदर 13% झाला तर हा खर्च ₹1,06,491 पर्यंत जातो. म्हणजेच फक्त 2% जास्त व्याजामुळे जवळपास ₹17,195 ची अतिरिक्त बचत होते. याशिवाय बँक आणि वित्तसंस्था प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट शुल्क आणि ग्राहकाच्या क्रेडिट स्कोरनुसार अतिरिक्त दर ठरवतात.
क्रेडिट प्रोफाइल आणि कर्ज कालावधीचे महत्त्व
बँक किंवा NBFC कर्ज देताना तुमची आर्थिक स्थिरता, नोकरीतील सातत्य आणि क्रेडिट इतिहास तपासतात. चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि वेळेवर भरलेल्या EMI यामुळे व्याजदर कमी मिळू शकतात. परंतु कर्जाची मुदत वाढवल्यास EMI कमी होते, मात्र कर्जाचा एकूण व्याज खर्च वाढतो. त्यामुळे EMI परवडेल आणि एकूण खर्चही जास्त होणार नाही, अशी योग्य समतोल योजना निवडणे महत्त्वाचे.
लपलेले चार्ज — जे अनेकदा दुर्लक्षिले जातात
पर्सनल लोनमध्ये व्याजाव्यतिरिक्त अनेक अतिरिक्त शुल्क असतात. ही माहिती आधीच समजून घेतल्यास पुढील अडचणी टाळता येतात.
- प्रोसेसिंग फी: कर्ज रकमेच्या 1% ते 3% पर्यंत.
- प्रीपेमेंट किंवा पार्ट-पेमेंट चार्ज: कर्ज लवकर फेडल्यास दंड.
- लेट पेमेंट चार्ज: EMI उशिरा भरल्यास मोठा दंड. अनेक वेळा लोक फक्त व्याजदर पाहून कर्ज घेतात आणि हे अतिरिक्त शुल्क लक्षात न आल्याने त्यांना लोन महाग पडते.
कर्ज घेण्याआधी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
- Annual Percentage Rate (APR) तपासा — यात व्याजासह सर्व शुल्कांचा समावेश असतो.
- EMI कॅल्क्युलेटर वापरून मासिक खर्च आणि एकूण परताव्याचा अंदाज करा.
- EMI तुमच्या मासिक बजेटमध्ये सहज बसते का, हे निश्चित करा.
- प्रीपेमेंट सुविधा कमी शुल्कात आहे का, हे तपासा.
कर्ज घेण्याचा निर्णय समजूनच घ्या
पर्सनल लोन योग्य वापरल्यास उपयुक्त ठरते. पण फक्त तातडीचा उपाय म्हणून घेतल्यास ते आर्थिक तणाव निर्माण करू शकते. कर्ज घेण्याआधी त्याची खरी किंमत समजून घ्या, तुमची गरज आणि आर्थिक क्षमता यांचा तौलनिक विचार करा आणि त्यानंतरच सर्वोत्तम ऑफर निवडा. योग्य नियोजनच तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकते.









