नोकरीत असताना दरमहा पगार येत राहतो. मात्र रिटायरमेंटनंतर खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. केवळ बचत पुरेशी ठरत नाही. सुरक्षित, खात्रीशीर आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारी योजना आवश्यक असते. अशा वेळी LIC च्या पारंपरिक योजना अनेकांसाठी विश्वासाचा पर्याय ठरतात.
LIC वर गुंतवणूक का सुरक्षित मानली जाते
LIC ही देशातील सर्वात मोठी विमा संस्था आहे. केंद्र सरकारच्या मालकीमुळे या संस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक आहे. LIC च्या योजनांमध्ये बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम होत नाही. त्यामुळे दीर्घकालीन नियोजनासाठी या योजना सुरक्षित मानल्या जातात.
LIC जीवन शिरोमणी पॉलिसी
LIC जीवन शिरोमणी ही नॉन-लिंक्ड, वैयक्तिक विमा बचत योजना आहे. जास्त उत्पन्न असलेल्या आणि मोठ्या विमा संरक्षणाची गरज असलेल्या व्यक्तींना ही योजना उपयुक्त ठरते. 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या पॉलिसीसाठी किमान प्रीमियम सुमारे 94,000 रुपये दरमहा आहे. प्रीमियम भरण्याचा कालावधी 4 वर्षांचा असून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पर्याय उपलब्ध आहेत.
या योजनेसाठी किमान वय 18 वर्षे आहे. पॉलिसी कालावधीप्रमाणे कमाल वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
LIC बीमा कवच योजना
LIC बीमा कवच ही उच्च संरक्षण देणारी टर्म इन्शुरन्स योजना आहे. या योजनेत 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक विमा संरक्षण घेता येते. विमा संरक्षणाची मर्यादा 100 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरते.
LIC जीवन आनंद योजना
LIC जीवन आनंद ही पारंपरिक विमा योजना असून कमी प्रीमियममध्ये दीर्घकालीन लाभ देते. दरमहा सुमारे 1,358 रुपये प्रीमियम भरून भविष्यात मोठा निधी उभारता येतो. या योजनेत बोनसचाही लाभ मिळतो. किमान 15 वर्षे पॉलिसी चालू ठेवल्यास बोनसचा फायदा मिळतो.
LIC जीवन आजाद योजना
LIC जीवन आजाद ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग वैयक्तिक योजना आहे. 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना उपलब्ध आहे. किमान विमा रक्कम 2 लाख रुपये असून कमाल मर्यादा 5 लाख रुपये आहे. या योजनेत मॅच्युरिटीवेळी एकरकमी रक्कम मिळते. 90 दिवसांपासून 50 वर्षांपर्यंत वयोगटातील व्यक्तींना ही पॉलिसी घेता येते.
LIC योजनांचे प्रमुख फायदे
LIC च्या योजना केवळ परतावा देण्यासाठी नाहीत, तर जीवन सुरक्षा, कर सवलत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा भाग आहेत. पारंपरिक योजनांमध्ये प्रीमियमवर बोनस मिळण्याची शक्यता असते. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी वय, आर्थिक उद्दिष्टे आणि गरज लक्षात घेऊन योग्य योजना निवडणे आवश्यक आहे.

