Jeevan Pramaan Patra — सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पेन्शनधारकांना वार्षिक ‘जीवन प्रमाणपत्र’ जमा करण्यासाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ‘जीवन प्रमाण’ नावाची आधार-आधारित डिजिटल सेवा आता घरबसल्या उपलब्ध झाली आहे.
घरबसल्या मिळणार डिजिटल सुविधा
सरकारने 10 नोव्हेंबर 2014 रोजी ही डिजिटल सेवा सुरू केली होती. आता ती PSB Alliance Doorstep Banking आणि India Post Payments Bank (IPPB) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच, आता पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक थेट आपल्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करतील.
कोण वापरू शकतो ही सुविधा?
ही सुविधा सरकारी आणि बिगर-सरकारी दोन्ही पेन्शनधारकांसाठी खुली आहे.
- 80 वर्षांवरील नागरिकांना 1 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रमाणपत्र सादर करता येईल.
- 60 ते 80 वर्षे वयोगटातील पेन्शनधारकांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या काळात प्रक्रिया पूर्ण करता येईल.
सुविधा कशी मिळेल?
पेन्शनधारकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा किंवा Post Info App द्वारे पोस्टमन किंवा ग्राम डाक सेवकाला घरी बोलावण्याची विनंती करावी.
शुल्क किती लागेल?
- IPPB ग्राहक आणि बिगर-IPPB ग्राहकांसाठी घरपोच सेवा पूर्णपणे मोफत आहे.
- डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर ₹70 + GST इतका नाममात्र शुल्क आकारला जाईल.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (PSB) ग्राहक हे प्रमाणपत्र PSB Alliance Doorstep Banking द्वारे पूर्णपणे मोफत मिळवू शकतात.
आवश्यक कागदपत्रे आणि अटी
- आधार क्रमांक असणे आवश्यक.
- मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा.
- आधार बँक किंवा पोस्ट ऑफिसशी नोंदणीकृत असावा.
- पेन्शन प्रकार, PPO क्रमांक, खाते क्रमांक आणि विभागाचे नाव आवश्यक.
Doorstep Banking साठी विनंती कशी कराल?
- DSB मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि लॉगिन करा.
- मोबाईल क्रमांक टाकून OTP किंवा PIN ने प्रवेश करा.
- आपल्या बँकेचे नाव आणि पिन कोड टाका.
- तुमच्या परिसरात सेवा उपलब्ध आहे का हे सिस्टम सांगेल.
- सेवा उपलब्ध असल्यास, बँक खात्याची माहिती (masked form) दिसेल.
- सेवा प्रकार, पत्ता आणि वेळ स्लॉट निवडा.
- स्लॉट उपलब्ध असल्यास बुकिंग कन्फर्म करा.
- बुकिंगनंतर SR ID आणि SVC (Service Verification Code) मिळेल.
- ठरलेल्या वेळेत पोस्टमन किंवा एजंट तुमच्या घरी येऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करेल.
प्रमाणपत्र डाउनलोड कसे कराल?
प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर SMS द्वारे तुम्हाला Transaction ID मिळेल. या आयडीच्या साहाय्याने jeevanpramaan.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.









