इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइलिंगची डेडलाइन 16 September 2025 पर्यंत होती आणि देशभरातील कोट्यवधी करदात्यांनी आपले रिटर्न वेळेवर दाखल केले. आता या सर्वांना रिफंड मिळण्याची आतुरता आहे. साधारणतः रिटर्न फाइल केल्यानंतर 1 आठवड्यात रिफंड थेट बँक खात्यात जमा होतो. काही वेळा फक्त 2-3 दिवसांतही रक्कम मिळते. मात्र तुमच्या खात्यात अजून रिफंड आला नसेल तर रिफंड स्टेटस तपासण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणे गरजेचे आहे.
ई-व्हेरिफिकेशननंतर सुरू होतो रिफंडचा प्रवास
इनकम टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच रिफंडची प्रक्रिया सुरू होते. बहुतांश प्रकरणांमध्ये रिटर्न फाइल केल्यानंतर 2 ते 4 आठवड्यांत रक्कम जमा होते. परंतु ठरावीक कालावधीतही रिफंड न मिळाल्यास, रिटर्न फॉर्ममध्ये झालेल्या छोट्या चुका, आयकर विभागाकडून आलेल्या नोटिसांना दिलेला प्रतिसाद किंवा ई-फाइलिंग पोर्टलवरील रिफंड स्टेटस तपासणे आवश्यक ठरते. रक्कम मोठी असल्यास देखील प्रक्रिया अधिक वेळ घेऊ शकते.
रिफंड उशीर होण्यामागील मुख्य कारणे
बँक अकाउंट प्री-वॅलिडेटेड नसल्यास
बँक अकाउंटवरील नाव आणि पॅन कार्डवरील नाव वेगळे असल्यास
IFSC कोड चुकीचा किंवा अवैध असल्यास
ITR मध्ये नमूद केलेले अकाउंट बंद असल्यास
पॅन आणि आधार लिंक नसेल तर
या कारणांमुळे रिफंडमध्ये उशीर होऊ शकतो. म्हणून रिटर्न दाखल करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
रिफंड स्टेटस कसे तपासाल?
www.incometax.gov.in या वेबसाइटवर जा आणि पॅन व पासवर्डने लॉगिन करा.
पॅन आधारशी लिंक नसेल तर ‘Link Now’ ऑप्शनवर क्लिक करून आधी लिंक करा.
टॉप मेन्यूमधील ‘Service’ पर्यायावर क्लिक करा आणि ‘Know your Refund Status’ निवडा.
ई-फाइल टॅबमध्ये ‘Income Tax Returns’ वर क्लिक करून ‘View Filed Returns’ निवडा.
तुमचा रिफंड स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
महत्त्वाची सूचना
इनकम टॅक्स रिफंडची प्रक्रिया वेळेवर व्हावी यासाठी ई-व्हेरिफिकेशन नंतर सर्व माहिती योग्य प्रकारे अपडेट करा. बँक अकाउंट डिटेल्स, पॅन-आधार लिंकिंग आणि IFSC कोडची तपासणी करा.









