HDFC Bank Cuts MCLR: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. HDFC बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात (Interest Rate) 15 बेसिस पॉईंटने कपात केली आहे. त्यामुळे बँकेकडून लोन घेणाऱ्या ग्राहकांची मासिक EMI कमी होणार आहे. दिवाळीच्या अगोदरच हा गिफ्ट मिळाल्याने कर्जदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एचडीएफसी बँकेचा मोठा निर्णय
HDFC Bank ही सध्या सुमारे 15 लाख कोटी रुपयांहून अधिक मार्केट व्हॅल्यू असलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक व्हॅल्यूएबल कंपनी आहे. बँकेने आपल्या Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
नवीन व्याजदर काय आहेत?
एचडीएफसी बँकेने विविध टेन्योरनुसार MCLR दरांमध्ये 15 बेसिस पॉईंटपर्यंत घट केली आहे. आता बँकेचे नवीन MCLR दर 8.40% ते 8.65% दरम्यान असतील, जे यापूर्वी 8.55% ते 8.75% होते.
- ओव्हरनाईट MCLR: 8.55% वरून 8.45%
- 1 महिन्याचा दर: 8.40%
- 3 महिन्याचा दर: 8.45% (15 बेसिस पॉईंट घट)
- 6 महिने आणि 1 वर्षाचा दर: 8.55%
- 2 वर्षाचा दर: 8.60%
- 3 वर्षाचा दर: 8.65%
या दरांमुळे लोन घेणाऱ्यांची EMI लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) ही ती किमान व्याजदर मर्यादा आहे, ज्याखाली कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. ही संकल्पना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2016 साली सुरू केली होती, ज्यामुळे कर्जदारांना न्याय्य व्याजदर मिळावा. ही दररचना मुख्यतः होम लोन, पर्सनल लोन आणि कमर्शियल लोनसाठी लागू असते.
EMI वर थेट परिणाम कसा होईल?
MCLR दरांमध्ये झालेली कपात थेट EMI वर परिणाम करते. यामुळे फ्लोटिंग व्याजदर असलेल्या होम लोन आणि पर्सनल लोनधारकांची EMI कमी होईल. सध्या HDFC बँकेचे होम लोन दर 7.90% ते 13.20% दरम्यान आहेत. ग्राहकाचा क्रेडिट प्रोफाइल आणि कर्जाचा प्रकार यावर हा दर अवलंबून असतो.
या कपातीमुळे बँकेच्या फ्लोटिंग रेट ग्राहकांवर EMI चा भार कमी होईल. HDFC बँक ही पाऊल उचलताना आपल्या डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल खर्च आणि Cash Reserve Ratio (CRR) यांचा विचार करते. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमधील बदल MCLR दरावर थेट परिणाम करतात.









