Gold Price Today: खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

Gold Price Today: मागच्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (Gold Silver Price) किमती मध्ये घसरण दिसून येत आहे. नवरात्रीत सोने चांदीचे भाव अचानक घसरल्याने सोने खरेदी लोकांचा कल दिसून येत आहे.

बुधवारीसुद्धा सोने चांदीचे दर काही प्रमाणात घसरलेले दिसून आले मात्र आज सोन्याचा भाव स्थिर दिसून येत असून चांदीचा दरात घसरण झाली आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,970 रुपये आहे. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 550 रुपये आहे. (gold silver price update 29 september 2022)

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक असतो?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% दुसऱ्या धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विक्री करतात.