Gold Price Today : आज सोन्याच्या भावात वाढ झाली आणि सोने प्रति तोळे 56 हजार पार झाले.
मकर संक्रांतीला महिला सोन्याचे दागिने खरेदी करतात त्यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव 56,290 रुपये झाला आहे. हाच भाव नागपूर, पुणे येथे राहील.
तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात देखील वाढ पाहण्यास मिळाली आहे. आता 22 कॅरेट सोने प्रति तोळे 51,600 रुपये झाले आहे.
सोन्याचे भाव भारतात प्रत्येक शहरात तेथील राज्य आणि स्थानिक करांच्या मुळे वेगवेगळा असतो.

असे असले तरी फार जास्त फरक सोन्याच्या भावात पाहण्यास मिळत नाही. महाराष्ट्रात हा फरक 30 ते 50 रुपये प्रति तोळे असू शकतो.