Gold Price Today: सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण आज सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे. सध्या पितृपक्ष सुरु आहे त्यामुळे सोने खरेदी करण्यात लोक संकोच करतात त्यामुळे सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्याच्या दुकानात सध्या गर्दी कमी दिसत आहे. यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या किमती वर झाला आहे आणि किंमत थोडी घसरली आहे.
लवकरच नवरात्र उत्सव सुरु होईल आणि दसरा-दिवाळीचा सण आहे याकाळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. अश्या वेळी सोन्याचे दर थोडे वाढतात त्यामुळे सोने खरेदी आता करायची का थोडे थांबून दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर करायची हे तुम्हाला ठरवावे लागेल. तत्पूर्वी आपण आजचा सोन्याचा भाव पाहू.

Gold Price News
आज सोन्याचा भाव घसरला
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलेली आहे. goodreturns या साईट अनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर आज 540 रुपयांनी घसरला आहे. तर 22 कॅरेट सोनीचा दर आज 500 रुपयांनी घसरला आहे.
आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,11,170 प्रति 10 ग्राम आहे. हा भाव स्थानिक शहरातील टॅक्स अनुसार थोडाफार कमी जास्त असू शकतो तरी तुमच्या स्थानिक सराफा दुकानात सोन्याच्या भावाची खात्री करून घेणे योग्य राहील.
आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज महाराष्ट्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,01,900 प्रति 10 ग्राम आहे. हा भाव स्थानिक शहरातील टॅक्स अनुसार थोडाफार कमी जास्त असू शकतो तरी तुमच्या स्थानिक सराफा दुकानात सोन्याच्या भावाची खात्री करून घेणे योग्य राहील.
आता पाहूया, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
| शहर | आजचा दर |
|---|---|
| मुंबई | 1,01,900 रुपये |
| पुणे | 1,01,900 रुपये |
| नागपूर | 1,01,900 रुपये |
| कोल्हापूर | 1,01,900 रुपये |
| जळगाव | 1,01,900 रुपये |
| ठाणे | 1,01,900 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
| शहर | आजचा दर |
|---|---|
| मुंबई | 1,11,170 रुपये |
| पुणे | 1,11,170 रुपये |
| नागपूर | 1,11,170 रुपये |
| कोल्हापूर | 1,11,170 रुपये |
| जळगाव | 1,11,170 रुपये |
| ठाणे | 1,11,170 रुपये |
डिस्क्लेमर: वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
सोने खरेदी हि नेहमी तुमच्या विश्वासार्ह ठिकाणी करावी. तसेच दोन-तीन वेगवेगळ्या दुकानात सोन्याचे दर तुलना केल्यास तुम्हाला योग्य सोन्याचा दर काय आहे याचा अंदाज येईल.








