EPFO ने दिले नवीन अपडेट, 7 करोड युजरसाठी महत्वाचे अपडेट

EPFO ने PF सदस्यांसाठी मोठा डिजिटल बदल केला आहे. आता सिंगल लॉगिनमधून PF बॅलन्स, पासबुक आणि दावा स्थिती तपासा. Passbook Lite फीचरमुळे सेवा आणखी सोपी झाली आहे.

On:
Follow Us

EPFO New Update: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी महत्त्वाचा डिजिटल सुधार लागू केला आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी जाहीर केले की आता EPFO सदस्यांना सर्व सेवा एका सिंगल लॉगिनमधून मिळतील. यामध्ये PF पासबुक डिटेल्स, बॅलन्स तपासणी, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, दावा स्थिती अशा सर्व सुविधा समाविष्ट आहेत. यापूर्वी प्रत्येक सेवेकरिता वेगवेगळ्या पोर्टलवर लॉगिन करावे लागत होते, परंतु या नव्या व्यवस्थेमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

सिंगल लॉगिनमुळे काय बदलणार

नव्या सिंगल लॉगिन सिस्टीममुळे EPFO सदस्यांना PF खाते पाहण्यासाठी आता अनेक पायऱ्या पार करण्याची गरज नाही. फक्त एकाच यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे PF बॅलन्स, दावा स्थिती, पासबुक व इतर महत्त्वाची माहिती सहज मिळणार आहे. यामुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय सेवांचा वापर अधिक सोपा होईल.

पासबुक लाइट फीचरची सुरुवात

याआधी सदस्यांना PF जमा, पैसे काढणे किंवा अॅडव्हान्सची माहिती पाहण्यासाठी स्वतंत्र पासबुक पोर्टलवर लॉगिन करावे लागत होते. आता EPFO ने नवा ‘Passbook Lite’ फीचर सुरू केला आहे. या फीचरमुळे सदस्य पोर्टलमध्येच थेट संक्षिप्त आणि सोपी माहिती पाहता येईल, आणि वेगळ्या पोर्टलवर जाण्याची गरज राहणार नाही.

दोन पर्यायांची सोय कायम

ज्यांना व्यवहारांची सविस्तर माहिती व ग्राफिकल सादरीकरण हवे आहे, त्यांच्यासाठी विद्यमान पासबुक पोर्टल पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील. त्यामुळे आता सदस्यांना दोन पर्याय मिळणार आहेत –

  1. Passbook Lite : साध्या आणि संक्षिप्त माहितीकरिता

  2. मूळ पासबुक पोर्टल : विस्तृत आणि ग्राफिक सादरीकरणासह माहितीकरिता
    ही दोन्ही सोय पोर्टलवरील गर्दी कमी करेल आणि वापरकर्त्यांना वेगवान सेवा अनुभव देईल.

डिजिटल बदलाचा फायदा

EPFO च्या या डिजिटल उपक्रमामुळे सदस्यांना कुठेही, कधीही आपले PF खाते पाहणे सुलभ झाले आहे. वेगवान प्रोसेस, कमी वेळेत व्यवहार तपासणी आणि तांत्रिक अडचणी कमी होण्याचा थेट लाभ लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Manoj Sharma

My Name is Manoj Sharma, I Work as a Content Writer for marathigold.com and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel