Blue Aadhaar Card: आपण कधी आपल्या आधार कार्डच्या रंगाकडे लक्ष दिलं आहे का? जर नाही तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आधार कार्ड दोन प्रकारचे असतात आणि त्यांचा रंगही एकमेकांपासून वेगळा असतो. सहसा, तुम्हाला सर्वांकडे पांढऱ्या कागदावर काळ्या रंगात छापलेले आधार कार्ड दिसतील. परंतु मुलांसाठी बनवलेले आधार कार्डचा (Child Aadhaar Card) रंग बिलकुल वेगळा असतो.
मुलांचे आधार कार्ड निळ्या रंगाचे असते
जेव्हा UIDAI मुलांसाठी आधार कार्ड जारी करते तेव्हा ते निळ्या रंगाचे असते. निळ्या (Blue Aadhaar Card) रंगाच्या आधार कार्डला ‘बाल आधार’ असेही म्हणतात. UIDAI नुसार नवजात शिशूचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र आणि पालकांच्या आधार कार्डद्वारे बनवले जाते.
5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलांसाठी 12 अंकी निळ्या रंगाचे आधार कार्ड बनवले जाते. हे 5 वर्षांपर्यंत वैध असते आणि त्यानंतर ते अमान्य होते, त्यानंतर ते अपडेट करावे लागते. नियमानुसार नवजात शिशूचे आधार कार्ड 5 वर्षेपर्यंतच वापरले जाऊ शकते. 5 वर्षांच्या कालावधीनंतर ते अपडेट न केल्यास ते निष्क्रिय (Inactive) केले जाते. 5 वर्षानंतर मुल 15 वर्षांचे झाल्यावर पुन्हा बॉयोमेट्रिक अपडेट करावे लागते.
UIDAI नुसार नवजात शिशूचे फिंगरप्रिंट (Fingerprint) घेतले जात नाही. परंतु मुल 5 वर्षांचे झाल्यावर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करावे लागते.
60 दिवसांत निळे आधार जारी होते
आपल्या मुलाला घेऊन नोंदणी केंद्रावर जा. तिथे नोंदणीसाठी फॉर्म भरून जमा करा. कागदपत्रांच्या स्वरूपात पालकांना आपले आधार कार्ड द्यावे लागेल. तुम्हाला एक फोन नंबर द्यायला सांगितले जाईल ज्याद्वारे निळे आधार कार्ड जारी केले जाईल. निळ्या आधारात बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नाही, फक्त एक फोटो क्लिक केला जाईल. कागदपत्रे पडताळून झाल्यावर एक संदेश येईल. पडताळणी झाल्यावर 60 दिवसांच्या आत तुमच्या मुलाला निळे आधार कार्ड जारी केले जाईल.
5 वर्षानंतर असे आधार अपडेट करा
मुलांसाठी हे अनिवार्य बॉयोमेट्रिक अपडेट पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. चला आपण कसे आपल्या मुलाचे आधार बनवू किंवा अपडेट करू शकतो ते जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला एकदा तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल.
असे बुक करा अप्वाइंटमेंट
https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर जाऊन अपॉइंटमेंट बुक करा. वेबसाइटवर होमपेज उघडल्यानंतर तुम्हाला येथे Book an appointment पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्थान तपशील भरा आणि Proceed to Book an appointment वर क्लिक करा. सर्व माहिती पडताळून झाल्यावर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी Submit वर क्लिक करा. आता तुम्हाला सर्व मूळ कागदपत्रांसह Aadhar enrolment centre वर जावे लागेल.