celebrities

आपल्या स्वताच्या बळावर मुलांचे संगोपन करणाऱ्या या 5 बॉलिवूडच्या प्राउड सिंगल मदर

मुलांचे संगोपन करणे हे आईवडील दोघांचे काम असते, पण अनेक वेळा परिस्थिती अशी होते कि आई किंवा वडील यापैकी एकालाच मुलांची काळजी घ्यावी लागते. असे मानले जाते कि मुलांना जेवढी आईची ममता पाहिजे असते तेवढी वडिलांची सोबत आणि थोडा धाक त्यांच्या संगोपनात येतो. परंतु बॉलिवूड मध्ये असे सिंगल पेरेंट पाहण्यास मिळतात ज्यांनी आपल्या पार्टनर शिवाय मुलांचे संगोपन केले आहे. बॉलिवूड मधील या सिंगल मदर ज्यांनी आपल्या मुलांना वडिलांच्या शिवाय लहानाचे मोठे केले आहे.

सुष्मिता सेन

बॉलिवूडची अभिनेत्री आणि पूर्व ब्रह्माण्ड सुंदरी सुष्मिता सेन कायमच सिंगल मदर राहिली आहे. सुष्मिता ने अजून पर्यंत लग्न केलेले नाही आणि दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिताच्या मुली दत्तक घेण्याच्या निर्णयाची खूप चर्चा झाली होती की विना लग्न करता सुष्मिता आपल्या मुलींचे संगोपन कसे करेल पण सुश्मिता ने हे व्यवस्थित करून दाखवले. आता सुष्मिताच्या मुली मोठ्या झाल्या आहेत आणि सुष्मिता एक प्राउड सिंगल मदर आहे.

रविना टंडन

मस्त मस्त गर्ल रविना टंडन देखील सगळ्यांना अभिमान वाटावा अशी आई आहे. अनिल ठडानी  सोबत लग्न करण्या अगोदरच रविनाने दोन मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचे संगोपन उत्तम पध्द्तीने केले आणि एवढेच नाहीतर आपल्या दोन्ही दत्तक मुलींचे लग्न देखील राविनाने मोठ्या धुमधडाक्यात केले. रविना आणि अनिल यांची दोन आपत्य आहेत. आज रविनाला एकूण चार मुले आहेत आणि चारही मुलांना रविनाने आपले एक सारखे प्रेम दिले आहे. रविना आणि अनिल यांच्या पहिल्या मुलीचा 2005 मध्ये जन्म झाला आणि त्यानंतर 2007 मध्ये एका मुलाचा जन्म झाला.

करिष्मा कपूर

कपूर घराण्याची करिष्मा कपूरने संजय कपूर सोबत लग्न केले पण त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही. दोघांचे नाते काही काळानंतर संपुष्टात आले आणि नंतर घटस्फोट घेतला. करिष्माला दोन समायरा आणि कियान नावाची दोन आपत्य आहेत आणि करिष्मा त्यांची प्राउड सिंगल मदर आहे. करिष्मा बिजनेस चालवते आणि त्यामधून वर्षाला करोडो रुपये उत्पन्न मिळवते.

अमृता सिंह

अमृता ने आपल्या पेक्षा 12 वर्ष लहान सैफ सोबत लग्न केले पण काही काळानंतर यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनीं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सैफ ने करीना सोबत लग्न केले. सैफ आणि अमृता यांनी दोन आपत्य आहेत इब्राहिम आणि सारा. सारा ने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. दोघांची देखभाल अमृता ने एकटीनेच केली आहे कारण सैफ चित्रपटा मध्ये व्यस्त राहत होता. परंतु सारा ही अमृता आणि सैफ दोघांच्या सोबत तेवढीच जवळीक ठेवून आहे आणि आपल्या आईवर तिचे खूप प्रेम आहे.

सारिका

कमल हसन यांची दुसरी पत्नी सारिका देखील एक सिंगल मदर आहे. सारिका आणि कमल यांचे अफेयर जेव्हा सुरु झाले तेव्हा कमल पहिलेच विवाहीत होते. परंतु नंतर त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि इकडे शृतीचा जन्म देखील झालेला होता. यानंतर कमल हसन यांनी सारिका सोबत लग्न केले. परंतु यांचे नाते जास्त काळ पुढे जाऊ शकले नाही आणि 2004 मध्ये ते वेगळे झाले. यानंतर श्रुतीचे संगोपन सारिकाने एकटीनेच केली.

Tags
Show More

Related Articles

Back to top button