health

1 ते 12 महिन्यात होणारी बाळाची वाढ

आपले बाळ कसे मोठे होत आहे हे पाहणे खरेच फार आनंददायक असते. त्याच सोबत आपल्याला थोडीफार काळजी देखील वाटते की आपल्या बाळाची वाढ योग्य गतीने होत आहे का नाही. यासाठी आज येथे 1 ते 12 महिन्यात बाळाची वाढ कशी होते हे सांगितले आहे

3 महिन्या पर्यंत बाळाची वाढ

तुमचे बाळ तुमच्या सोबत हसायला लागते.

बाळ लोकांना हळूहळू ओळखायला लागते.

आता त्यांना खेळायला आवडते आणि बोलता येत नसले तरी तसा प्रयत्न करण्यास ते सुरवात करतात.

पोटावर पालथे होऊन रांगायला सुरुवात करतात तर हळूहळू त्यांची मान पकडायला लागते.

बाळ हाताचा आणि त्याच्या डोळ्यांचा एकत्रित वापर करून वस्तू पाहिली की त्याकडे आकर्षित होऊन हात लावतात.

त्याच सोबत ते आता तुम्हाला लांबून देखील ओळखतात.

ह्यावेळी त्यांचे हात तितकेसे मजबूत पकड करण्यास समर्थ नसतात पण त्यांना हात असल्याची जाणीव होण्यास सुरुवात होते.

4 ते 7 महिन्याच्या बाळाची वाढ

बाळ आता खट्याळ, खेळकर आणि हसणारे होऊन जाते.

आता अगदी सहज आपल्या पोटावर रांगून ते सगळीकडे फिरायला लागते.

बाळ तुमच्या मदती शिवाय बसण्याचा प्रयत्न करतो आणि सोबतच तुम्ही दिलेल्या खेळण्याच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न करतो.

बाळाला तुमच्या आवाजाची समज होते आणि तो तुम्हाला प्रतिसाद देखील द्यायला लागतो, एवढेच नाही तर तुम्ही हो किंवा नाही बोललेले त्याला समजते.

बाळाला आपले नाव काय आहे हे समजते. तुम्ही त्याचे नाव घेतले की ते मागे वळून पाहते.

आरशातील स्वताचे प्रतिबिब पाहून घाबरतो.

8 ते 12 महिन्याच्या बाळाची वाढ

बाळ तुमची नक्कल करायला लागतो ते फार खट्याळ होते.

ते उठण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करते तर काही बाळ या दिवसात चालायला लागतात.

बाळाचे बोलणे स्पष्ट होण्यास सुरुवात होते आणि तुम्ही त्यावर हसता.

बाळाच्या हाता मध्ये वस्तू उचलण्य एवढी ताकत आलेली असते.

आता बाळाचे जेवणाचे प्रमाण वाढू लागते आणि ते खायला नखरे करू लागते.

हल्लीची बाळ मोबाईल ऑपरेट करण्याचा प्रयत्न करू लागतात. पण इतक्या लहान मुलांना मोबाईल देऊ नये.

आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकी, बहीण, भाऊ या सर्वांना ओळखायला लागतात.

 

एक महत्वाचे म्हणजे हे सर्व असेच होईल असे नाही याचा क्रम पुढे मागे होऊ शकतो. प्रत्येक बाळाची प्रवृत्ती वेगळी असते. काही बाळांचे दात वर्ष होण्याच्या आत येत नाहीत तर काही बाळाचे सहा महिन्यात ही येतात. तर काही बाळ वर्ष होऊनही चालायला लागत नाही तर काही अगदी धावायला लागतात. आपले बाळ वेळेनुसार सर्वच शिकतात काही थोडा वेळ घेतात तर काही जलद असतात. तेव्हा थोड सबुरीने घ्या 1 वर्षानंतर बाळ स्वताला खूप विकसित करून घेतात म्हणून स्वताच्या बाळा बद्दल न्यूनत्व ठेवू नका.


Show More

Related Articles

Back to top button