Best Multi Cap Funds: थोड्या गुंतवणुकीत विविध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर मल्टी कॅप फंड्स हा एक आकर्षक पर्याय मानला जातो. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या सर्व मार्केट सेगमेंटमध्ये समतोल गुंतवणुकीमुळे हे फंड्स रिस्क आणि रिटर्न यांच्यात योग्य संतुलन ठेवतात. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत टॉप मल्टी कॅप फंड्सनी दमदार परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. अनेक फंड्सनी एकमकटीत गुंतवणुकीला 3 ते 4 पट वाढवले असून, SIP गुंतवणुकीवर देखील उत्तम परतावा मिळालेला आहे.
टॉप 7 मल्टी कॅप फंड्सचा परफॉर्मन्स
खाली दिलेल्या टेबलमध्ये टॉप 7 मल्टी कॅप फंड्सचे गेल्या 5 वर्षांचे लंपसम आणि SIP रिटर्न्स दाखवले आहेत:
| फंडाचे नाव | CAGR (लंपसम, 5 वर्ष) | 1 लाखाची व्हॅल्यू | SIP परतावा (5 वर्ष) | 5,000 रु. SIP व्हॅल्यू |
|---|---|---|---|---|
| Nippon India Multicap Fund | 32.75% | 4,12,261 रुपये | 26.89% | 5,81,941 रुपये |
| Quant Multicap Fund | 29.54% | 3,64,770.29 रुपये | 18.68% | 4,77,567 रुपये |
| Mahindra Manulife Multicap Fund | 29.26% | 3,60,845 रुपये | 23.71% | 5,39,347 रुपये |
| ICICI Prudential Multicap Fund | 27.16% | 3,32,470 रुपये | 22.39% | 5,22,428 रुपये |
| Baroda BNP Paribas Multicap Fund | 26.99% | 3,30,254 रुपये | 21.14% | 5,06,875 रुपये |
| Invesco India Multicap Fund | 26.20% | 3,20,108 रुपये | 21.43% | 5,10,445 रुपये |
| Sundaram Multicap Fund | 25.70% | 3,13,817 रुपये | 19.94% | 4,92,347 रुपये |
मल्टी कॅप फंड्सची गुंतवणूक रणनीती काय आहे?
मल्टी कॅप फंड्स, ज्यांना डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड्स असेही म्हणतात, हे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये कमीत कमी 25-25% गुंतवणूक करतात. SEBI च्या नियमानुसार या फंड्सना नेहमी 75% रक्कम इक्विटी व संबंधित इन्स्ट्रुमेंट्समध्ये ठेवावी लागते. लार्ज कॅप स्टॉक्स स्थैर्य देतात, तर मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स झपाट्याने वाढीची संधी देतात. त्यामुळे या फंड्समध्ये रिस्क आणि रिटर्न यांचा संतुलित अनुभव येतो.
कोणासाठी योग्य आहेत मल्टी कॅप फंड्स?
जे गुंतवणूकदार कमी रकमेच्या माध्यमातून आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्थैर्य आणि विविधतेसह चांगला परतावा मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी मल्टी कॅप फंड्स फायदेशीर ठरू शकतात. मात्र, हे लक्षात ठेवा की हे फंड्स देखील इक्विटी मार्केटच्या चढ-उतारांपासून वाचू शकत नाहीत. त्यामुळे SEBI ने या फंड्सना “Very High Risk” असे रेटिंग दिले आहे.
डिस्क्लेमर
ही माहिती फक्त माहितीच्या उद्देशाने दिली आहे. यामधील कुठलीही गुंतवणुकीसाठी थेट शिफारस नाही. म्युच्युअल फंड्समधील पूर्वीचा परतावा भविष्यात कायम राहील याची हमी नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.














