astrology

कुंडली न दाखवता पण करू शकता हे उपाय, ज्यामुळे दूर होईल गरिबी

कोणत्याही व्यक्तीची कुंडली ही जन्म तारीख, जन्मवेळ आणि स्थान यावरून बनवली जाते. कुंडली मध्ये 12 भाव असतात आणि 9 ग्रह कोणत्या स्थानी आहेत हे दर्शवलेले असते. हे स्थान पाहून ज्योतिषी आपले भूत, भविष्य आणि वर्तमान सांगतात.

जर कुंडली मध्ये ग्रहांची स्थिती दोषयुक्त आहे तर आपले भाग्य आपली साथ देणे कठीण असते. अश्यावेळी ग्रह दोष दूर करण्यासाठी ज्योतिषी काही उपाय सांगतात जे केल्यामुळे आपल्याला फायदा मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रा मध्ये काही उपाय असेही आहेट जे केल्यामुळे सर्व ग्रहांचे दोष दूर केले जाऊ शकतात म्हणजेच कुंडली न दाखवताही हे उपाय केले जाऊ शकतात. हे उपाय केल्यामुळे घरातील गरिबी दूर होते.

1) प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आणि पौर्णिमाच्या रात्री चंद्र देवास जल अर्पण करावे आणि पूजा करावी. असे केल्यामुळे चंद्र दोष दूर होतात आणि माते संबंधीच्या समस्या दूर होतात.

2) दर महिन्याच्या अमावस्या तिथीवर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. पूजे नंतर 7 प्रदक्षिणा माराव्यात. या उपायाने शनी, राहू-केतू चे दोष दूर होतात आणि नोकरी मध्ये लाभ मिळण्याची शक्यता वाढते.

3) रोज सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंग वर चांदीच्या तांब्याने दुध अर्पण करावे. यानंतर त्याच तांब्याने पाणी सुध्दा अर्पण करावे. या उपायाने दुर्भाग्य दूर होऊ शकते.

4) रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यास तांब्याच्या तांब्याने जल अर्पण करावे. या उपायामुळे सूर्य दोष दूर होतात. घर-परिवार आणि ऑफिस मध्ये सर्व ठिकाणी मान-सन्मान मिळतो.

5) कोणत्याही गरीब व्यक्तीस मसूरची डाळ दान करावी. या उपायामुळे मंगळ दोष दूर होतात. जागा-जमिनीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

6) प्रत्येक बुधवारी गणपतीस 21 दुर्वा अर्पण कराव्यात. ॐ गं गणपतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. या उपायमुळे बुध ग्रहाचे दोष दूर होतात. बुद्धीशी निगडीत कामात फायदा होतो.

7) प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूस केळे आणि रव्याचा शिरा (सत्यनारायण प्रसाद) यांचे नैव्यद्य द्यावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मोठ्यातील मोठी समस्यामुक्ती देतो हा लिंबू आणि लवंगचा उपाय


Show More

Related Articles

Back to top button