Self-confidence Tips: जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाचा अभाव हे देखील एक कारण असू शकते. वास्तुशास्त्रात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढू शकतो. आत्मविश्वासच तुम्हाला पुढे नेतो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला प्रगती देतो, त्यामुळे जर तुम्हीही आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे अपयशाचा मार्ग पत्करला असेल, तर घाबरू नका, Self-confidence वाढवणाऱ्या उपायांबद्दल जाणून घ्या.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रत्न घालू शकता

असे मानले जाते की पक्ष्यांना अन्न आणि पाणी दिल्याने देखील आत्मविश्वास वाढू शकतो.

तुमची लिव्हिंग रूम उगवत्या सूर्याच्या किंवा धावत्या घोड्याच्या चित्राने सजवा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि घरातील नकारात्मकताही दूर होते. घोडा आतल्या बाजूने धावला पाहिजे.

कधीही रिकाम्या भिंतीकडे तोंड करून बसू नका कारण ती तुमचा आत्मविश्वास डळमळीत करू शकते.

शनी यंत्र घरात ठेवा.

तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर लिंबू आणि हिरवी मिरची लटकवा. लिंबू सुकले तर ते शनिवारीच बदलून घ्या. गाईंला हिरवा चारा द्या.

तसेच कुत्र्यांना खायला द्या आणि प्रेम करा. घरात मासे ठेवा आणि किमान गोल्डन फिश ठेवा.

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, म्हणजे यशाचा मार्ग तुमच्यासाठी आपोआप खुला होईल.

Recent Posts