Tulsi Upay : तुळशीच्या रोपाला औषधी गुणांसह सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मीय मान्यतेनुसार तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते. तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामध्ये अनेक देवता वास करत असल्याचा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. वास्तुशास्त्रातही घरात तुळशीचे रोप लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुळशी सुकली तर ती कशी वापरायची? आज आम्ही तुळशीच्या पानाचे अनेक उपाय सांगणार आहोत, जे केल्याने तुम्हाला आर्थिक सुख मिळते.
पिठाच्या दिव्याने ज्योत लावा
ज्योतिषशास्त्रानुसार निद्रिस्त भाग्य जागृत करण्यासाठी पिठाचा दिवा बनवा. यानंतर त्यामध्ये तूप आणि चिमूटभर हळद टाकून संध्याकाळी दिवा लावावा. त्यानंतर तो दिवा तुळशीच्या मुळांमध्ये उत्तर दिशेला ठेवा. दिवा ठेवताना हात तुळशीला लागू नये याची विशेष काळजी घ्या. असे केल्याने तुमचे बंद नशीब उघडू लागेल.
एकादशीला तुळशीला गूळ अर्पण करा
तुमच्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यात करण्यासाठी एकादशीच्या दिवशी तुळशीला गूळ अर्पण करा. असे केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. भगवान विष्णूंना गूळ अतिशय प्रिय आहे. म्हणूनच ते भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात आणि सुख-दु:खाच्या भोवऱ्यातून मोकळे करतात.
या मंत्राचा रोज जप करा
तुमच्या वाईट दिवसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. तुळशीच्या रोपाची पूजा करताना त्याच्याजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चा १०८ वेळा जप करावा. यासोबतच माता तुळशीसमोर बसून त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगा. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी वास करत असल्याने तुमची तक्रार थेट देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यापर्यंत पोहोचते, ज्याद्वारे ते तुमचे सर्व त्रास दूर करतात.