Surya Gochar 2022 In Dhanu: प्रत्येक महिन्यात एका विशिष्ट कालावधीला सूर्य आपली राशी बदलतो. यावेळी डिसेंबरमध्ये सूर्य धनु राशीत प्रवेश करणार. यावेळी जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा काही राशीच्या लोकांचे वाईट दिवस संपतील आणि जीवनात आनंद आगमन करेल.
कुंडली मध्ये जेव्हा सूर्य शुभ स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. चला जाणून घेऊया 16 डिसेंबर रोजी होणारे सूर्य गोचर (Surya Gochar) कोणत्या राशी च्या लोकांसाठी लाभदायक राहील.
सिंह : ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर शुभ आणि फलदायी ठरेल. सूर्य या राशीच्या पाचव्या स्थानात प्रवेश करणार आहे. यामुळे व्यवसायात व्यक्तीला चांगला फायदा होईल. संतानसुख प्राप्त होईल. त्याचबरोबर या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे. राजकारणात सक्रिय लोकांना काही पद मिळू शकते. व्यवसायातही चांगला फायदा होईल.
धनु : सूर्य 16 डिसेंबरलाच धनु राशीत प्रवेश करणार आहे. या अर्थाने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. सूर्य तुमच्या राशीत भ्रमण करेल. अशा स्थितीत सरकारी नोकरी आणि प्रशासनाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. राजकारणाशी संबंधित लोकांनाही फायदा होईल. एवढेच नाही तर नशिबात वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान रखडलेली कामे करता येतील.
तूळ : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) सूर्याचा धनु राशीतील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर राहील. या राशीच्या तिसऱ्या घरात सूर्य देवाचे भ्रमण होणार आहे. हे धैर्य आणि शौर्य, भाऊ आणि बहिणीचे स्थान मानले गेले आहे.
अशा परिस्थितीत करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे सूर्य गोचर चांगले होणार आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांनाही या काळात संधी मिळेल. जर तुम्ही व्यापारी असाल आणि तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे.
मीन : ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी देखील सूर्याचे गोचर लाभदायक ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. त्याचबरोबर परदेशात जाण्याची शक्यताही निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात राजकारणाशी संबंधित लोकांना काही पद मिळू शकते. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ आणि फलदायी असेल.