Shani Surya Gochar 2023: कुंभ राशीत शनि आणि सूर्य यांची युति, या तीन राशीला भयंकर नुकसान

Shani Surya Gochar 2023: सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र असले तरी शत्रू आहेत. यांची युति झाल्यामुळे कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशींनी सावध राहण्याची गरज आहे.

Shani Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्मफलदाता देवता शनिदेव फेब्रुवारी 2023 मध्ये एकाच राशीत येणार आहेत. शनिदेव 17 जानेवारीला मकर राशी मधून कुंभ राशीत प्रवेश करतील. तर सूर्य देखील 13 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार.

अशा प्रकारे कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनि यांची भेट होईल यास ग्रहांची युति असे म्हणतात. सूर्य आणि शनीचा युति काही राशींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो. जाणून घ्या दोन मोठ्या ग्रहांच्या युतिमुळे कोणत्या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

कर्क : शनि-रवि युती कर्क राशीच्या लोकांसाठी अशुभ बातमी आणू शकते. या दरम्यान वाहन चालवताना काळजी घ्या. दुखापत होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. दोन्ही ग्रहांच्या युतिमुळे पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्चिक : शनीच्या सूर्याशी युतीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. या काळात थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक ताण घेणे टाळा.

कुंभ : शनि आणि सूर्याच्या युतिमुळे कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यक आहे. या दोन ग्रहांच्या युतीने कुंभ राशीच्या लोकांसाठी कठीण काळ सुरू होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. नवीन काम सुरू करणे पुढे ढकलू शकता. नात्यात मतभेद होऊ शकतात.

Follow us on

Sharing Is Caring: