Shani Gochar in Aquarius 2023: नवीन वर्ष 4 राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शनि या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.
सध्या शनि मकर राशी मध्ये आहेत जे आपली राशी बदलून कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. हा राशी बदल 17 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. शनिच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे मीन राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे.

शनि गोचर होण्यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा लाभ देखील होणार आहे. चला जाणून घेऊ कोणत्या राशीच्या लोकांना शनि कुंभ राशीत प्रवेश केल्याचा लाभ होईल.
वृषभ : आत्तापर्यंत कामात जे अडथळे जाणवत होते, ते अडथळे शनिचे कुंभ राशीत गोचर होताच दूर होतील. शनीचे गोचर तुम्हाला मोठे पद देईल. उत्पन्नही वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप सकारात्मक असेल. लव्ह लाईफसाठीही वेळ चांगला राहील. विवाह जुळण्याची जोरदार शक्यता आहे.
मिथुन : शनीच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना दिलासा मिळेल. तणाव दूर होतील. शनिमुळे आतापर्यंत जो त्रास होता, तो आता दूर होणार आहे. करिअरसाठी चांगला काळ सुरू होईल. व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल.
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर खूप शुभ राहील. प्रगतीचा मार्ग खुला होईल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रमोशन मिळेल. मान-सन्मान वाढेल.
धनु : धनु राशीच्या लोकांना खूप दिवसांनी शनीच्या साडेसतीपासून मुक्ती मिळेल. धन समृद्धी प्राप्त होईल. आजारांपासून आराम मिळेल. नशीब तुमची साथ देईल.