Mangal Gochar 2023: ज्योतिष शास्त्र (Astrology) अनुसार प्रत्येक ग्रहांचे गोचर महत्वाचे आहे. मंगळ 2023 मध्ये एका राशी मधून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनाचा दुसऱ्या राशीवर परिणाम होतो.
मंगळ राशी परिवर्तन कोणत्या राशीला लाभदायक
मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगती करता येईल.
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूप शुभ असणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या दहाव्या भावात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना इच्छित बदली मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारणा होईल.
मीन राशी : मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर खूप शुभ असणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या चौथ्या भावात प्रवेश करेल. तुमच्या सुखसोयी वाढू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.