Ketu Gochar 2023 in Taurus : सामान्य माणसाच्या मनामध्ये केतू बद्दल कायम भीती असते. परंतु केतू हा काही राशीच्या बाबतीत लकी देखील ठरतो. केतू गोचर कोणत्या राशीसाठी लाभदायक राहणार जाणून घेऊ.
सर्व राशीच्या लोकांवर ग्रह नक्षत्रांचा प्रभाव असतो. प्रत्येक ग्रहाच्या गोचर होण्याचा परिणाम सर्व राशीवर कमी अधिक प्रमाणात होतो. काही राशीवर याचा प्रभाव चांगला असतो तर काही राशीवर अशुभ प्रभाव पडतो.
ज्योतिषशास्त्रात केतूला छाया ग्रह मानले जाते. कर्म प्रधान ग्रह केतू नवीन वर्षात राशी बदलेल. केतूचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे गोचर सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे, काही राशींसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे.
सध्या केतू कन्या राशीत आहे पण ऑक्टोबर 2023 मध्ये तूळ राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या केतू राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
वृषभ : केतू गोचर होण्याचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना होईल. तुमचे आरोग्य सुधारेल. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसायात चांगला लाभ होईल.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी केतू गोचर काळ शुभ ठरणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. नातेसंबंध सुधारतील. समाजात मान-प्रतिष्ठा प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्यांशी संबंध मधुर होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
धनु : केतू गोचर धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे.या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. कार्ट-कचेरी प्रकरणात विजय मिळेल. जुन्या आजारांपासून मुक्ती होऊ शकते. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होईल.
मकर : मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर लाभ होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिकांसाठी चांगला काळ राहील.