Health
आवळा आणि मध करतील तुमची एनर्जी रिचार्ज, सोबत मिळतील 10 फायदे
आयुर्वेदा मध्ये काही असे उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यामध्येच एक उपाय आहे आवळा आणि मध. ज्याचा वापर केल्यामुळे शरीर एकदम फिट आणि उर्जेने भरपूर राहते. सोबतच तुम्हाला खालील 10 फायदे मिळतात.
कृती :
हिरव्या आवळ्याना बारीक करून किंवा त्याचा कीस करून कपड्याच्या मदतीने आवळा रस काढावा. त्यानंतर 15 ग्राम (तीन छोटे चमचे) आवळा रस मध्ये 15 ग्राम मध मिक्स करून पहाटे व्यायाम केल्यानंतर प्यावे. यानंतर 2 तासा पर्यंत काही घेऊ नये. हिरव्या आवळ्याचा रस आणि मधाचा हा उपाय सतत दीड-दोन महिने केल्याने काया पलट होतो. सर्व रोगा पासून वाचण्यासाठी हा एक श्रेष्ठ उपाय आहे.
आवळा आणि मध खाण्याचे फायदे
याच्या वापरामुळे शारीरिक कमजोरी नष्ट होते.
यामुळे आमाशयास मजबुती मिळते आणि शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते.
सेवन करताना ब्राम्ह्चार्याचे पालन करावे आणि तेल, मिर्ची, आंबट पदार्थ टाळावे.
मासिक धर्म अनियमितता आणि मासिकधर्माच्या गडबडी मध्ये हा उपाय लाभदायक ठरतो.
डोकेदुखी, नेत्ररोग इत्यादी अनेक रोगांच्या पासून सुटका मिळून नवसंजीवनी मिळेल.
वरील प्रयोगा सोबत जर त्रिफला जल ने डोळे धुतल्याने मोतीबिंदू मध्ये आराम मिळतो.
ताजे आवळे चावून खाण्यामुळे तोंडाची उष्णता शांत होते, डोळे निरोगी राहतात, बद्धकोष्ठ दूर राहतो, हृदय आणि मेंदू शक्तिशाली होते आणि चेहऱ्यावर नवीन तेज येते.
महर्षी चरक यांचे मत होते की जगामध्ये जेवढेही रसायन औषधी आहेत त्यामध्ये आवळा उत्कृष्ट आहे, कारण यामध्ये रोग निवारक, रक्तशोधक आणि आरोग्यवर्धक गुण आहे, तेवढे अन्य कोणत्याही वस्तू मध्ये नाही.
आवळा चूर्ण 5-10 ग्राम एक चमचा मधा मध्ये मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी चाटल्यामुळे थाइरोइड सारख्या गंभीर आजार 1-2 महिन्यात गुडघे टेकतात.
