lovePeoplerelationship

जर पत्नी सारखी रुसते किंवा रागावते तर पतीने काय केले पाहिजे

बऱ्याच वेळा पती किंवा पत्नीच्या रागामुळे मोठ्या विवादाचा उदय होतो. क्रोध हा नेहमी नुकसानदायक असतो आणि यामुळे व्यक्ती योग्य-अयोग्य यामधील फरक विसरतो. रागामध्ये काही वेळेला असे शब्द बोलले जातात जे दीर्घकाळ त्रास देतात.

वैवाहिक जीवनात जीवनसाथीच्या क्रोधाचे उत्तर शांतीने दिले पाहिजे. जर एक व्यक्ती क्रोधीत असेल तर दुसऱ्याने शांत राहीले पाहिजे, शांत पणे बोलून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर दोघेही क्रोधीत होतील तर गोष्ट हाता बाहेर जाऊ शकते.

येथे पाहूया प्रसिध्द दार्शनिक सुकरातच्या वैवाहिक जीवनाचा एक किस्सा, कसे सुकरात ने क्रोधीत राहणाऱ्या पत्नीला शांत केले.

हा आहे तो प्रसिद्ध किस्सा

महान युनानी दार्शनिक सुकरातच्या व्यवहारात अहंकार नव्हता. ते अत्यंत लोकप्रिय, अत्यंत सरळ, सहनशील आणि विनम्र स्वभावाचे होते.

नम्र स्वभावाच्या सुकरातची पत्नी अत्यंत रागीट होती. ती छोट्याछोट्या गोष्टीवर भांडत असे, पण सुकरात शांत राहत असे. ते तिच्या टोमण्यांना कोणतेही उत्तर देत नसत आणि दुर्व्यवहार अति झाल्यावर देखील कोणतेच उत्तर देत नसत.

जेव्हा पत्नीने सुकरात वर टाकले होते पाणी

एक वेळा सुकरात आपल्या शिष्यांना घेऊन घराच्या बाहेर बसले होते आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करत होतो. तेव्हाच घरातून त्यांच्या पत्नीने काही कामासाठी त्यांना आवाज दिले, पण सुकरात चर्चे मध्ये असल्यामुळे त्यांचे आवाजाकडे लक्ष राहिले नाही.

सुकरातला पत्नीने अनेक वेळा आवाज दिला, पण मग्न असलेल्या सुकरातच्या कानाला तिचा आवाज आलाच नाही. आटा पत्नीचा राग अनावर झाला. तीने शिष्यांच्या समोरच एक घडा भर पाणी सुकरात वर टाकले.

हे पाहून शिष्यांना फार वाईट वाटले.

सुकरात शिष्यांची भावना समजून शांत स्वरात म्हणाला – पहा, माझी पत्नी किती काळजी घेते या भीषण गरमीमध्ये मला थंडावा मिळण्यासाठी तीने असे केले.

आणि पत्नीचा राग शांत झाला

आपल्या गुरूची सहनशीलता पाहून शिष्यांनी त्यांना नमस्कार केला आणि पत्नीचा क्रोध पण शांत झाला.

पत्नीच्या क्रोधाला साज्ज्नातेने उत्तर दिल्याने तिचा क्रोध शांत होतो आणि मोठे विवाद निर्माण होत नाहीत. घरात शांतता टिकवण्यासाठी नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा.


Show More

Related Articles

Back to top button